Rajesh tope : शरद पवारांना जातीयवादी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा..

शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करण्याआधी स्वतः राज ठाकरे राज्यात सध्या ज्या पद्धतीचे राजकारण करत आहे, यावरून खरे जातीयवादी कोण हे स्पष्ट होते. (Rajesh Tope)
Rajesh Tope- Raj Thackeray
Rajesh Tope- Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेतील भाषणातील मुद्दे आणि प्रामुख्याने त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीयवादी असा केलेला उल्लेख याचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटतांना दिसतायेत. गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार व त्याच्या राष्ट्रवादी या पक्षाची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असा आरोप केला होता.

औरंगाबादच्या सभेत देखील त्यांनी पुन्हा याचा उल्लेख केला. शरद पवार यांना हिंदु या शब्दाचीच अॅलर्जी आहे, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी तर राज ठाकरे यांनी शरद पवारांना जातीयवादी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका केली आहे. (Marathwada)

राजेश टोपे म्हणाले, काही वर्षापुर्वी राज ठाकरे हे शरद पवारांचे गोडवे गात होते, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत होते. आता मात्र अचानक त्यांना शरद पवार हे जातीयवादी दिसू लागले आहेत. याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतयं असंच म्हणावे लागेल. याला मराठीत चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात, असा टोला देखील टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना लगावला.

Rajesh Tope- Raj Thackeray
Hingoli : मनसेच्या शंभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करण्याआधी स्वतः राज ठाकरे राज्यात सध्या ज्या पद्धतीचे राजकारण करत आहे, यावरून खरे जातीयवादी कोण हे स्पष्ट होते. उलट राज ठाकरे यांनीच आता आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला देखील टोपे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com