Jalna : २६ तासांपासून आयकर विभागाकडून छापे; शुभविवाहाचे बॅनर लावून पथक आले..

आत्तापर्यंतची मराठवाड्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. या पथकाकडून जिंदल मार्केटमधील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. ( Jalna)
Incom Tax Raid In jalna District News
Incom Tax Raid In jalna District NewsSarkarnama

जालना : शहरातील औद्योगीक वसाहतीत असलेल्या नामकीत स्टील कंपनी व दहा ते बारा व्यापाऱ्यांवर (Incom Tax) प्राप्तिकर विभागाच्या १९० हुनअधिक अधिकाऱ्यानी गाड्यावर विवाह समारंभाचे स्टिकर लावून काल सकाळ पासून छापेमारी सुरू केल्याने व्यापारी वर्गात एकच खबळ उडालीय. (Jalna) २६तासापासून ही छापेमरी सुरू अडल्याने या छाप्यातून नेमके काय हाती आले, हे आध्याप कळू शकले नसले तरी प्रति कर विभागाला बॅन अकाउंट सह पक्की टीप देण्यात आल्याने ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारी मध्ये मुंबई,नाशिक,पुणे,नगरसह औरंगाबादच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सामावेश असल्याचे समजते. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी शंभरहून अधिक चार चारचाकी वाहनातून विवाह सोहळ्याचे बॅनर लाऊन जालन्यात दाखल झाले होते. (Marathwada) ज्या व्यावसायिक आणि घरावर छापे टाकायचे त्या ठिकाणीच ही शंभरहून अधिक वाहन कुणाला काहीही न विचारता पोचल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

आत्तापर्यंतची मराठवाड्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. या पथकाकडून जिंदल मार्केटमधील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. सील केलेल्या दुकानांवर स्टिकर चिकटविण्यात आले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन आणि विक्री याबाबतच्या नोंदी तपासल्या जात असून बँकांमधील व्यवहारही तपासले जात आहेत.

Incom Tax Raid In jalna District News
Parbhani : तिघांचे घ्या, चौथ्याला मतदान करा, आमदार गुट्टेंचा लक्ष्मीदर्शनाचा नवा फंडा..

गेल्या २६ तासापासून ही कारवाई सुरूअसून शहरातील कुण्या मोठ्या व्यक्तीच्या टीप वरून ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. हवालातून होणाऱ्या उलाढाली. देवाण घेवणीतून ही छापेमरी केल्या जात असल्याच्याचे बोलले जाते. जालना शहरात १०० हुन अधिक वाहनातून हे अधिकारी राहुल-अंजली असे विवाह स्टिकर लावलेल्या गाड्यातून दाखल झाल्याने कुणाच्या तरी विवाह सोहळ्यासाठी या गाड्या आल्या असल्याचं अंदाज लावला जात होता. असल्याने कुणाला ही शंका आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com