राहुल गांधींनी मारला कांदाभजीवर ताव; शेतकरी कुटूंब भावूक

Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी आणि ती कॅमेरात कैद करण्यासाठी हजारो हात आणि डोळे आसुसलेले होते.
Bharat Jodo Yatra |
Bharat Jodo Yatra |

Bharat Jodo Yatra औरंगाबाद : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची एक झलक पाहण्यासाठी आणि ती कॅमेरात कैद करण्यासाठी हजारो हात आणि डोळे आसुसलेले होते. अशातच मंगळवारी (ता. ८) सायंकाळच्या टप्प्यात सात किलोमीटरचे अंतर पार यात्रा जेव्हा बिजूर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे पोचली, तेव्हा राहुल यांनी एका शेतकऱ्याच्या घरात जाऊन कांदेभज्यांवर ताव मारला. २५ मिनिटे ते हनुमंत शिनगारे यांच्या घरी थांबले. कुटूंबाचा आनंद आता गगनात मावेना झाला आहे.

नांदेड-देगलूर रस्त्यावरील बिजूर येथे राहणारे हनुमंत शिनगारे आणि सखुबाई शिनगारे यांचे १५ जणांचे कुटूंब. राहुल गांधींची यात्रा जेव्हा खतगावहून निघाल्यावर काही लोकांनी त्यांना राहुल गांधी घरी येणार असल्याचे सांगितले. सांगायला आलेल्या या लोकांनीच अंगणातील म्हशी बाहेर बांधायला आणि स्वच्छता करायला मदत केली. त्यानंतर चहा आणि कांदाभजे करण्यास सांगितले. सखुबाईंती नात उमाने नाष्टा बनविला.

Bharat Jodo Yatra |
Bharat Jodo : नरसी फाट्यावर पोहचताच दिवंगत राजीव गांधींच्या शेवटच्या सभेची आठवण..

खासदार राहुल गांधी संध्याकाळी ५.४५ ला शिनगारेंच्या घरी पोहचले. अंगणात आल्यानंतर त्यांनी ब्यारेलमधील पाणी काढून हात धुतला आणि थेट गच्चीवर जाऊन निवडक यात्रेकरुंसोबत बसले. तिथेच त्यांनी कांदाभजा आणि चहाचा आस्वाद घेतला. काही वेळ आराम केल्यानंतर अंगणात येऊन त्यांनी पुन्हा दहा मिनिटे शिनगारे कुटूंबियांशी गप्पा मारल्या. शेतीत काय पीक आहे? शेती कोरडवाहू की पाण्याची? अशी विचारपूस केली. त्यावर शेतात सोयाबीन, तूर होते. पण अतिवृष्टीने सोयाबीन वाया गेल्याचे शिनगारे यांनी सांगितले.

राहुल गांधीं घरासमोरुन जाणार त्यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून त्यांची एक नात तमनूर ते कपीलधार ही पदयात्रा पुर्ण करुन लवकर घरात आली. अचानक राहुल गांधी घरी आले. कुटूबियांशी बोलले. त्यानंतर अंगणातील बाजेवर बसून फोटो काढले. घरातील लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्कीटे त्यांनी दिली. शेतकरी कुटूंबानेही कुंकू, विभूती लावत शॉल देऊन त्याचे स्वागत केले. देशाचे मोठे नेते खासदार राहुल गांधी आमच्या घरात येऊन गेले. मलाच काय तर, सगळ्या कुटूंबियांना खुप आनंद झाला. आमची त्यांच्याप्रती भावना चांगली आहे म्हणूनच त्यांचे पाय आमच्या घराला लागले, अशा भावना हनुमंत शिनगारेंनी यावेळी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in