Old Pension Protest News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातही `पन्नास खोके, एकदम ओक्के` च्या घोषणा..

Marathwada : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील कार्यालयासमोर देखील शेकडो कर्मचारी आंदोलन करत आहेत.
Old Pension Protest News, Hingoli
Old Pension Protest News, HingoliSarkarnama

Hingoli : जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य सरकारी कर्मचारी संपावर आहेत. लाखो कामगार व त्यांच्या संघटनांनी जुन्या पेन्शनच्या (Old Pension) मागणीसाठी संप पुकारल्याने सरकारी कामकाजावर परिणाम होत आहे. अवकाळी, गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे रखडले आहेत.

Old Pension Protest News, Hingoli
Ambadas Danve News : शिंदे गटाला विधानसभेला ४८ जागा ? अरेरे मिंधे गॅंगची हीच किंमत का ?

सरकारने कर्माचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती नेमली आहे, तरीही कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. (Hingoli) वसमत येथे संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तर चक्क `पन्नास खोके, एकदम ओक्के`, अशा घोषणा देत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. (Marathwada) राज्यातील सत्तांतरापासून शिंदे गट व त्यांच्या मंत्री, आमदारांवर ५० कोटी घेवून बंड केल्याचा आरोप आणि टीका केली जाते.

विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका सर्वसामान्य देखील करू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव, पोळा आणि धुलिवंदन सारख्या सणांमध्ये देखील ५० खोके एकदम ओक्केचा जोरात प्रचार करण्यात आला. आता तर सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मागण्यांसाठी या घोषणांचा वापर सुरू केल्याने याची एकच चर्चा राज्यभरात होत आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत १४ मार्च पासून सरकारी कर्मचारी व त्यांच्या संघटना संपावर आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील कार्यालयासमोर देखील शेकडो कर्मचारी आंदोलन करत आहेत.

सरकार विरोधात मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करताना काही जणांनी चक्क `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणा दिल्या. शिंदे- फडणवीस सरकारवर टीका करतांना ओके सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही देखील कर्मचारी आहोत, पाहून घेऊ असा दम देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी भरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com