Protest Against Name Change News : इम्तियाज यांची भिती खरी ठरली, आंदोलनाचा मंडप ओस पडला..

Imtiaz Jalil : बोटावर मोजण्या इतकेच लोक आंदोलनस्थळी उपस्थितीत होते. साधरणतः दुपारी बारा वाजताचे हे चित्र होते.
Protest Against Name Change News
Protest Against Name Change NewsSarkarnama

Aimim : `मी दिल्लीत नामांतराचा विषय सभागृहात मांडणार आहे. हुकूमशाही पद्धतीने लादण्यात आलेले हे नामांतर, त्याला सर्वोच्च न्यायालयात कसे मांडायचे यासाठी वकिलांशी चर्चा करणार आहे. मी दिल्लीत असतांना जेव्हा टीव्हीवर बघेन किंवा माहिती घेईल, तेव्हा मला आंदोलनाचा मंडप गच्च भरलेला दिसला पाहिजे. तो रिकामा असला तर मिडियावाले मला प्रश्न विचारतील`, अशी चिंता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आंदोलनस्थळी केलेल्या भाषणातून व्यक्त केली होती.

Protest Against Name Change News
Imtiaz Jalil News : पंतप्रधान अवास योजनेची ४६ हजार घरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पळवली..

हा माझा वैयक्तिक लढा नाही, हे सगळ्यांचे आंदोलन आहे, तेव्हा सगळ्यांनी साखळी उपोषणात हजेरी लावावी, असे आवाहन देखील त्यांनी केले होते. (Aimim) परंतु इम्तियाज जलील हे दिल्लीला संसदीय अधिवेशनासाठी जाताच आंदोलनाचा मंडप ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलेली भिती खरी ठरली असेच म्हणावे लागेल. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास केंद्राने नुकतीच परवानगी दिली.

या निर्णयाच्या विरोधात इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. इम्तियाज जलील हे दररोज या आंदोलनाला भेट देवून उपस्थितांचा उत्साह वाढवत होते. परंतु दिवसेंदिवस मंडपातील गर्दी कमी होत असल्याने आंदोलनाच्या आठव्या दिवशी इम्तियाज यांनी अर्धा तास भाषण करत नागरिकांना भावनिक आवाहन केले होते.

वेळ मिळेल तसं आंदोलनस्थळी येवून बसा, नामांतराच्या विरोधात घरोघरी जावून अर्ज भरून घ्या, असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु काल इम्तियाज जलील अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले आणि दुसऱ्याच दिवशी आंदोलनावर परिणाम झाला. दररोज गर्दीने ओसंडून वाहणारा आंदोलनाचा मंडप आज अक्षरश: ओस पडला होता. बोटावर मोजण्या इतकेच लोक आंदोलनस्थळी उपस्थितीत होते. साधरणतः दुपारी बारा वाजताचे हे चित्र होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com