नाकाच हाड मोडले तरी त्या हटल्या नाही.. प्रियंका गांधींनी सांगितला तो किस्सा..

दगडफेक करणाऱ्यांना तुमची कृती योग्य नाही, तुमचे म्हणणे मी ऐकून घ्यायला तयार आहे, मग ही दडफेक का करता? असा सवाल त्यांनी हल्लेखोरांना केला. (Priyanka Gandhi)
Indiar Gandhi-Priyanka Gandhi
Indiar Gandhi-Priyanka GandhiSarkarnama

औरंगाबाद : इंदिरा गांधी म्हणजे माझ्या अज्जी या एक निर्भीड, धैर्यशील आणि वीर अशा राजकीय नेत्या होत्या. (Indira Gandhi) आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले, जेव्हा की त्यांना हे माहित होते, की यामुळे काही लोक आपल्यावर नाराज होतील, आपल्या इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतील. (Priyanka Gandhi) तरीही त्यांनी जनतेच्या हितासाठी ते निर्णय घेतले आणि रोषही पत्करला. (Congress) पण त्या कधी मागे हटल्या नाहीत.

एका सभेत त्यांच्यावर जनतेतून दगडफेकण्यात आले, यात हल्यात त्यांच्या नाकाचे हाट तुटले पण त्या भाषण केल्याशिवाय थांबल्या नाहीत, अशी आठवण काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सांगितली. `लडकी हू, लढ सकती हू`, या मोहिमेंअंतर्गत प्रियंका यांनी फेसबुकच्या माध्यमांतून महिला, तरुणी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी समोरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना प्रियंका उत्तरे देत होत्या.

आपल्या अज्जी इंदिरा गांधी यांच्याबद्दलची आठवण, प्रसंग ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली तो सांगा, असे म्हटल्यावर, प्रियंका यांनी इंदिरा गांधी यांचे मोठेपण सांगतानाच पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षे संदर्भात घडलेला प्रकार आणि त्याचे भाजपकडून होत असलेले भांडवल याच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीका केली.

प्रियंका गांधी म्हणाल्या, मी बारा वर्षांची असतांनापासून आम्ही एकाच घरात राहत होतो. इंदिराजी या माझ्या आदर्श आहेत, कारण त्यांचे राजकारण, निर्णय घेण्याची क्षमता, निडरता, विरता आणि धैर्य मी जवळून पाहिले, अनुभवले आहे. मला एक प्रसंग आजही आठवतो, ओरिसामध्ये एका जाहीर सभेस संबोंधित करण्यासाठी त्या गेल्या होत्या.

Indiar Gandhi-Priyanka Gandhi
रावसाहेब दानवेंना कोरोना, सत्तारांनाही ताप..

इंदिराजींनी घेतलेल्या एका निर्णयाबद्दल तिथल्या लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी काहीही होऊ शकते, त्यांच्यावर हल्ला देखील केला जाऊ शकतो याची कल्पना असून देखील त्या घाबलरल्या नाही. त्या सभेला गेल्या, भाषण करायला सुरूवात केली आणि समोरून अचानक दगडफेक सुरू झाली. त्यातील एक दगड इंदिराजींच्या तोंडावर लागला आणि त्या खाली कोसळल्या.

नाकातून रक्तस्त्रावर सुरू झाला, पण त्या उठून उभ्या राहिल्या. भाषण पुन्हा सुरू केले, दगडफेक करणाऱ्यांना तुमची कृती योग्य नाही, तुमचे म्हणणे मी ऐकून घ्यायला तयार आहे, मग ही दडफेक का करता? असा सवाल त्यांनी हल्लेखोरांना केला. सुरक्षा रक्षकांनी इथून जाणे गरजेचे आहे, नाहीतर काहीही घडू शकते हे सांगितल्यानंतरच त्या तिथून गेल्या. लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची त्यांची धाडसी वृत्ती मला प्रेरणा देते, असेही प्रियंका म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com