'तो' प्रश्न विचारताच प्रीतम मुंडेंचा पारा चढला

जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथे तिथे आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे.
'तो' प्रश्न विचारताच प्रीतम मुंडेंचा पारा चढला
Pritam Munde sarkarnama

बीड : बीडच्या भाजप (BJP) खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी आज (ता. २३) बीडमध्ये (Beed) पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांचा चागलाच पारा चढला. जर विरोधी पक्ष म्हणून खासदारांचा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नाही तर I'm sorry to say मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.

 Pritam Munde
ममतांचा दे धक्का! राहुल गांधींचे निकटवर्ती माजी खासदार करणार तृणमूलमध्ये प्रवेश

ऑन द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड" जसे तुम्हाला वाजवायचे तसे तुम्ही वाजवा. बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनी लाटण्याची प्रकारणे घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर नामलगाव येथील गणपती मंदिराच्या २६ एकर जमीन लाटणार्‍यावर गुन्हा दाखल झाला नाही. एकीकडे आष्टीमध्ये गुन्हा दाखल होतो, मात्र बीडमध्ये होत नाही. यावर तुम्ही आवाज उठवणार का? असा प्रश्नन विचारला असता, यावर प्रीतम मुंडे म्हणाल्या, की 'जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथे तिथे आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही निश्चित करु, असे सांगत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

 Pritam Munde
गिरीश महाजन म्हणतात, दंगलींना राज्य सरकारचे समर्थन!

मात्र, यावर पुन्हा प्रश्न केला असता, मुंडे भडकून म्हणाल्या, की ऑन द रेकॉर्ड का ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला जसे वाजवायचे तसे वाजवा माझे काही म्हणणे नाही. माझे एवढेच म्हणणे आहे, जेव्हा समाजामध्ये सर्व काही अलबेल असावे ही अपेक्षा असते. तुम्ही पत्रकार म्हणूनही काम करता आणि सर्वसामान्य नागरिक म्हणूनही काम करता. पण हे करत असताना जसे खासदार म्हणून माझी काही जबाबदारी आहे, तसेच पत्रकार म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. जर विरोधी पक्ष म्हणून खासदारांचा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नाही तर I'm sorry to say मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही. असे प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांना सुनावले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in