Pritam Munde : बीडच्या सुरक्षा,भविष्याविषयी चिंता हा पंकजाताईंचा धर्मच

पंकजाताईंना पातळी सोडून राजकारण करता येत असते तर त्या खूप बोलल्या असत्या. पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. (Mp Pritam Munde)
Mp Pritma Munde, Beed
Mp Pritma Munde, BeedSarkarnama

बीड : बीड जिल्ह्याची सुरक्षा आणि भविष्याविषयीची चिंता हा पंकजाताई मुंडे यांचा धर्म आहे, यासाठीच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. (Beed) पण आज बीडची जी बदनामी होत आहे, ती केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे होत आहे असा, टोला खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना लगावला आहे.

बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पंकजाताई मुंडे यांनी मांडले, यात चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजाताईंनीच उपस्थित केला नाही तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

एवढेच नाही तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत या विषयावर आक्रमक लक्षवेधी मांडली, तरीही तुमचे डोळे उघडत नाहीत, जनतेला तुम्ही गृहीत धरत आहात का? असा संतप्त सवालही प्रितम मुंडे यांनी केला.

पंकजाताई ७ तारखेला हाॅस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट होत्या, त्यांची एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, त्यांची प्रकृती बरी नाही. पंकजाताईंना पातळी सोडून राजकारण करता येत असते तर त्या खूप बोलल्या असत्या. पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. तुमचे आमदार लक्षवेधी आधी देतात, गावातील कार्यालयापासून ते तुमच्या कॅबिनपर्यंत माफिया राज आहे हे जगजाहीर आहे.

Mp Pritma Munde, Beed
मोठी बातमी : शत्रुघ्न सिन्हा यांना ममतांनी दिलं लोकसभेचं तिकीट

जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या ज्या काही घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, ते तुमच्या कारभाराचे अपयश आहे. त्यावर चिंतन करायचे सोडून उलट पंकजाताईंवरच टिका करणे हे शोभते का? स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यावर फोडण्याची तुमची नेहमीचीच सवय आहे, अशी टीकाही प्रितम मुंडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com