Pravin Darekar News : गरिबांच्या स्प्नांचे इमले उभारणारे बजेट, पण विरोधक डोळे असून आंधळे..

Bjp : झोपेचे सोंग, डोळ्यावर झापड असलेल्यांना काय करणार. विरोधी पक्ष बेचैन आहे.
Bjp Mla Pravin Darekar
Bjp Mla Pravin Darekar Sarkarnama

Vidhan Parisad : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले बजेट हे स्वप्नांचे इमले बांधणारे असल्याची टीका विरोधक करत आहेत. पण हे बजेट गरिबांचे स्वप्न पुर्ण करणारे बजेट आहे. पण विरोधक डोळे असून आंधळ्या सारखे वागत असल्याने त्यांना ते दिसत नाही, असा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतांना त्यांनी बजेटचे समर्थन करतांना अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

Bjp Mla Pravin Darekar
Raju Shetty On Sattar : त्या विधानबद्दल मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना कान धरून जाब विचारावा..

प्रवीण दरेकर म्हणाले, स्प्नांचे इमले नाही, तर गोरगरिबांचे इमले उभारण्यासाठी निधीची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. (Maharashtra Budget) तीन वर्षात पंतप्रधान अवास योजनेच्या माध्यमातून दहा लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी १२ हजार कोटी रुपये दिलेत. हे स्वप्नांचे इमले आहेत का? सगळ्या समाजाला यात सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गरिबाला घर देण्याचे काम सरकार करतयं. १४ मार्चचा निकाल म्हणू घोषणा, निवडणूक जुमला अशी टीका अर्थसंकल्पावर करण्यात आली.

ज्येष्ठ नेत्यांचे मला आश्चर्य वाटते, ज्यांनी कधीकाळी बजेट मांडलेले आहे, ते शेती, उद्योग, रोजगार निर्मिती, गुंतवणूक यासाठी काहीच तरतूद केली नाही, असे कसे म्हणून शकतात. बजेट जर नीट पाहिले तर अशा सगळ्या गोष्टींची काळजी सरकारने घेतली आहे. तरी अजित पवार म्हणतात तरतूद केलेली नाही. झोपेचे सोंग, डोळ्यावर झापड असलेल्यांना काय करणार. विरोधी पक्ष बेचैन आहे, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार सुरू आहे.

अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत झाले ही यांची खरी पोटदुखी असल्याचे दरेकर म्हणाले. सणाला आनंदाचा शिधा दिला, सरकारच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे. गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीला देखील आनंदाचा शिधा सरकारकडून दिला जाणार आहे. विमानतळासाठी केवळ घोषणा नाही, तर त्यासाठी तरतूद देखील केली आहे. तेव्हा टीका करण्याआधी विरोधकांनी अर्थसंकल्पातील तरतूदी एकदा बघितल्या पाहिजेत.

आमच्या काळातल्या योजनांचे काय झाले? असे अजित पवार विचारतात. फडणवीस अर्थमंत्री असल्याने नियोजनाची विरोधकांनी काळजी करू नये. आपल्या काळात केवळ घोषणा केल्या, निवडक भाग, नेत्यांना निधी दिला. त्याला स्थगिती दिली, तर आकांडतांडव करण्याची गरज नाही. सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न बजेटमध्ये झाला आहे. थोर पुरुषांचा, महापुरुषांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. स्मारकांच्या घोषणा पण निधी कुठे? अशी टीका केली गेली.

Bjp Mla Pravin Darekar
Sandipan Bhumre News : आमदार राजपूतही आमच्या सोबत होते, ते ऐका खोक्यातच पळत सुटले असते..

पण अर्थसंकल्प नीट बघितला तर अर्थमंत्र्यांनी या सगळ्यांसाठी तरतूद केल्याचे दिसेल. यातून एकच अर्थ निघतो की विरोधक डोळे असून आंधळे आहेत की काय? मुंबईसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. मेट्रोची मोठी कामे मुंबईत होत आहे, त्याला गती देतांना भरघोस निधी दिला. ८२० कामांची योजना सरकारने आणली. तुमच्या काळात केलेल्या घोषणांचे काय झाले? त्या तुम्ही पुर्ण केल्यात का? गद्दारीवर कोणी बोलू नये, गद्दारी कोणी केली?

शिवसेना-भाजपला जनादेश दिला होता. राष्ट्रवादी-काॅंग्रेससोबत कोण गेलं? मग गद्दारी कोणी केली? असा सवाल देखील दरेकर यांनी केला. मुख्यमंत्र्यावर आरोप केले जातात, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. पण तुम्ही गहाण ठेवलेला पक्ष, चिन्ह शिंदेंनी सोडवले. युवराजांनी सांगितले संत, धर्माबद्दल सरकारला बोलण्याचा अधिकार नाही. पण कोरोनात उत्सवांवर बंदी, मंदीर बंद ठेवण्याचे काम तुम्ही केली. तुमचा आता भ्रमनिरास झाला आहे.

Bjp Mla Pravin Darekar
Sheetal Mhatre Viral Video: व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या पोरांना मध्यरात्री अटक; सभागृहात आव्हाड-देसाईंमध्ये खडाजंगी

जनता बजेटवर समाधानी आहे. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला गेला. जी वारेमाप उधळपट्टी सुरू होती, त्यालाच आम्ही स्थगिती दिली. महापालिका कुणाची जहागीरी नाही, २५ वर्षात आपण काय केले? याचा लेखाजोखा मांडा. फक्त डिपाॅझीट वाढवले ते कशासाठी? लोकांच्या हितासाठी आता आम्ही तो वापरणार आहोत.

मुंबईच्या सुशोभिकरणावर १ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. बजेटवर प्रभाव कोणाचा? असे विचारले जाते. तुमच्या बजेटवर राष्ट्रवादीचा, काॅंग्रेसचा प्रभाव होता. म्हणून ४० आमदारांनी उठाव केला, गद्दारी नाही, त्यांनी खुद्दारी केली. म्हणून त्यांच्या मतदारसंघात निधी मिळालायं असा टोला देखील दरेकरांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com