प्रज्ञा सातव म्हणतात, नांदेड, बारामती प्रमाणेच हिंगोली जिल्ह्याची मजबुत बांधणी करणार

(Pragya Satav testified that Hingoli district will be strong and Congress-friendly.)जिल्ह्यातील प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्याच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे.
(Mla Pradnya Satav
(Mla Pradnya SatavSarkarnama

हिंगोली ः राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांनी माझी विधान परिषदेवर बिनविरोध निवडण करण्यासाठी प्रयत्न केले. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण व इतर नेत्यांचा यात सिंहाचा वाटा आहे. बिनविरोध निवड झाल्यानंतर या नेत्यांनी मला आपला जिल्हा संघटनात्मक दृष्ट्या मजबुत करण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमचे नेते अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीने आपापले जिल्हे मबजुत केले, त्याचप्रमाणे मी देखील हिंगोली जिल्हा मजबुत आणि काॅंग्रेसमय करणार अशी ग्वाही, काॅंग्रेसच्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी दिली.

बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलतांना भविष्यात जिल्ह्यातील विकाकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक बांधणी या विषायवर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रज्ञा सातव म्हणाल्या, आज माझ्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्याच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे. राजीव सातव यांना जाऊन सहा महिने झाले, त्यांच्या जाण्याचे दुःख कधीही न विसरणारे आहे.

पण अशा दुःखाच्या काळात देखील सातव यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते डगमगले नाहीत. भक्कमपणे ते आमच्या पाठीशी उभे राहिले. विधान परिषदेवर माझी निवड झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते सोयाबीन विकून, खाजगी वाहने घेऊन मुंबईत मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. राजीव सातव यांनी कार्यकर्त्यांवर केले प्रेम, जिल्ह्यात केलेली विकासकामे याची ही पावतीच म्हणावी लागेल.

अनके विकास कामे साहेबांच्या काळात झाली, तर काही राहून गेली. पण आता त्यांचे अपुर्ण स्वप्न मी पुर्ण करणार आहे. संपुर्ण जिल्हा काॅंग्रेसमय करण्यासाठी जुन्या, नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांची मजबुत फळी सोबत घेऊन हा जिल्हा विकासाच्या दिशेने नेण्याचा आपला प्रयत्न राहील.

(Mla Pradnya Satav
निर्भयांचा आक्रोश सरकाच्या कानी पडत नाही, आता महिलांनीच कायदा हातात घ्यावा का?

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कुठल्या कामांना गती द्यायची, प्राधान्याने करायचे हे ठरवू. प्रशासकीय पातळीवर देखील जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी बैठका घेण्याचे नियोजन आहे.

या शिवाय आगामी काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही ताकदीने लढवू आणि जिंकू. विधान परिषदेवर माझी निवड होऊन मी जरी आमदार झाले असले, तरी राजीव सातव यांच्यावर प्रेम करणारा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता आज आमदार झाला आहे, अशी माझी भावना असल्याचेही प्रज्ञा सातव म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com