प्रत्येक आमदाराची ५० हजार कार्यकर्ते आणण्याची ताकद ; आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही..

एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तो अंतिम निर्णय असेल आणि तो सगळ्यांना मान्य असेल अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी याआधीच स्पष्ट केली आहे. मग शक्तीप्रदर्शनाचा,मंत्रीपदाचा प्रश्न येतोच कुठे? (Sanjay Shirsat)
Mla Sanjay Shirsat, Aurangabad News
Mla Sanjay Shirsat, Aurangabad NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचे स्वप्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रुपात पुर्ण झाले आहे. हा आनंद तळागाळातल्या शिवसैनिकाला झाला आहे, त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. तेव्हा त्यांना इथवर आणण्याचे माध्यम मी झालो आहे. शिंदेसाहेबांसोबतचा प्रत्येक आमदार हा मोठा आहे. ५० हजार कार्यकर्ते मुंबईत आणण्याची प्रत्येकाची ताकद देखील आहे. त्यामुळे हे शक्तीप्रदर्शन नाही, तर एकनाथ शिंदे यांच्यावर असलेले सर्वसामान्य शिवसैनिकाचे प्रेम आणि त्यापोटी त्यांना भेटण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईतील शक्तीप्रदर्शनावर भाष्य केले.

औरंगाबादेतून आज शेकडो शिरसाट समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी ते आल्याचे शिरसाट यांच्याकडून सांगितले जाते. (Shivsena) शिवसेनेने मात्र हे मंत्रीपदासाठी सुरू असलेले शक्तीप्रदर्शन अशी टीका केली आहे. मुंबईत असलेल्या शिरसाटांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर न देता हे शक्तीप्रदर्शन नसून शिवसैनिकांचे शिंदे यांच्यावरील प्रमे असल्याचे म्हटले आहे.

शिरसाट म्हणाले, सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला याचा आनंद तळागाळातील शिवसैनिकाला झाला आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती. त्यांना इथपर्यंत आणण्याचा मी प्रयत्न केला एवढेच. राहिला प्रश्न मंत्रीपदाचा तर एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तो अंतिम निर्णय असेल आणि तो सगळ्यांना मान्य असेल अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी याआधीच स्पष्ट केली आहे. मग शक्तीप्रदर्शनाचा आणि मंत्रीपदाचा प्रश्न येतोच कुठे?

Mla Sanjay Shirsat, Aurangabad News
shivsena : शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यात कोसळेल, लिहून घ्या ; खैरेंचा दावा..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत शिवसैनिकांच्या मातोश्रीवर बैठकावर बैठका घेत आहेत, याकडे लक्ष वेधले असता आता कुठे मातोश्रीची दारं उघडली आहेत, असा टोला शिरसाट यांनी लगावला. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेला आपण उत्तर देणार नाही, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, असेही शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com