Shivsena : सत्ता गेली, पक्षाचे नाव अन् चिन्हही ; मग ठाकरेंच्या सैनिकांची एकजूट कायम राहील ?

Aurangabad : मुंबई, ठाण्यानंतर सर्वाधिक झपाट्याने शिवसेनेची वाढ झाली ती मराठवाड्यात.
Uddhav Thackeray News, Aurangabad
Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama

Marathwada News : महाविकास आघाडीची सत्ता गेली, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाले, आता तर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेले. एकापाठोपाठ एक अशी संकट येत असतांना उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक जो शिंदेच्या बंडानंतरही एकजुट राहीला, तो यापुढे तसाच राहील का? असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात अनेक घटना घडामोडी घडल्या.

Uddhav Thackeray News, Aurangabad
Pankaja Munde News : या निर्णयाला पुढे नेण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो ..

मुंबईसह राज्यातील इतर भागात आपला दबदबा कायम ठेवणारी शिवसेना दोन भागात विभागली गेली. खरी (Shivsena) शिवसेना कोणाची याचाही फैसला काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असतांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. (Marathwada) ४० आमदार १३ खासदार गेलेल्या आणि आता पक्षाचे चिन्ह, नाव गेल्यानंतर ठाकरेंच्या सैनिकांची एकजूट कायम राहते का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

मुंबई, ठाण्यानंतर सर्वाधिक झपाट्याने शिवसेनेची वाढ झाली ती मराठवाड्यात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बाळासाहेबांच्या नावाची जादू आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सर्वमान्य होते. भाजपसोबत युतीधर्म पाळत असतांना ठाकरेंनी बीड, लातूर या जिल्ह्यांकडे संघटनात्मक दृष्ट्या फार लक्ष दिले नाही. पण इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद मोठी होती.

प्रस्थापित पक्षांना दणका देते स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा, लोकसभा निवडणुका जिंकत शिवसेना घट्ट पाय रोवून होती. पण २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपद स्वीकारले. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली ती शिंदे यांनी केलेल्या बंडाने.

भाजपने केलेल्या खेळीत ३५-४० वर्षात कमावलेलं वैभव गमावण्याची वेळ ठाकरेंवर आली. फक्त आमदार, खासदार नाही, तर पक्ष आणि चिन्ह देखील गमावावे लागले. शिंदे बंडानंतर मराठवाड्यात ठाकरेंनी चाळीस आमदारांनी केलेली गद्दारी, ५० खोकेचा प्रचार करत घेतलेल्या सभा, मेळाव्यातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळवली. उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी ठाकरेंवर निष्ठा कायम ठेवली.

Uddhav Thackeray News, Aurangabad
Ashok Chavan News : विखे माझे मित्र, पण ते शत्रूसारखं का वागतायेत ?

इतर जिल्ह्यांमध्ये निवडून आलेले आमदार जरी शिंदेंबरोबर गेले असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक ठाकरेंसोबत राहिला. सत्याचा विजय होईल, शिवसेना आपलीच आहे, आपलीच राहील असा विश्वास त्यांना दिला गेला. पण निवडणूक आयोगाच्या निकालाने सगळेच चित्र पालटले.

उद्धव ठाकरे यांनी नव्याने सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. पण सत्तेपुढे ठाकरेंच्या शिवसैनिकांची एकजूट पुढच्या कठीण काळात कायम राहील का? याबद्दल शंका उपस्थीत केली जात आहे. सत्ता आणि सहानुभूतीची लाट यापैकी विजय कोणाचा होतो? हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीतच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com