पोलिसांनी राज ठाकरेंचे भाषण वारंवार पाच तास ऐकले... नंतरच घेतला कारवाईचा निर्णय...

अटी शर्तींचे उल्लंघन झाले की नाही हे तपासण्यासाठी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांनी सायबर शाखेत पाच तास बसून राज ठाकरे यांचे ४५ मिनिटांचे भाषण ऐकले. (Aurangabad Police)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj Thackeray Sarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raj Thackeray) राज यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा (Fir Filed) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Aurangabad)

सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये. धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी यासह पोलीस आयुक्तांनी १६ अटी शर्तीनुसार राज ठाकरे (MNS) यांच्या सभेला परवानगी दिली होती, मात्र ठाकरेंनी दोन समाजात बाधा निर्माण होईल असे वक्तव्य केले.

चिथावणी देणारे भाषण केले यासह अनेक अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवलीकर आणि।इतर संयोजक यांच्याविरोधात कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MNS Chief Raj Thackeray
Beed : दोन खासदार अन् १० आमदार; पण शेतकऱ्यांशी संबंधीत बैठकीला तिघेच..

पुढील तपास ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करत आहेत. राज यांची सभा झाल्यानंतर या सभेचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला होता. सभेसाठी परवानगी देताना घालून दिलेल्या १६ अटी शर्तींचे उल्लंघन झाले की नाही हे तपासण्यासाठी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांनी सायबर शाखेत पाच तास बसून राज ठाकरे यांचे ४५ मिनिटांचे भाषण ऐकले. त्यानंतर अहवाल बनविण्याचे काम सुरु झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com