
नांदेड : नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचा (Murder) छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी नांदेड पोलिसांनी (Police) आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sanjay Biyani Murder case latest news update)
5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांची दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हा पासून पोलीस या हत्येचा तपस करत होते. अखेर पोलिसांनी त्यांच्या हत्येच्या छडा लावला आहे. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी व्यावसायिक बियाणी यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाच एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली. नांदेडच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दोन जण दबा धरून बसले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी आले तेव्हा हल्लेखोरांनी अगदी त्यांच्या कार जवळ जाऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कुटूंबियांनी त्यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नांदेडमध्ये बांधकाम व्यवसायात संजय बियाणी हे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे मुळ गाव नायगाव तालुक्यातील कोलंबी हे होते. पण 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडमध्ये स्थायिक झाले. सुरुवातीला स्थानिक केबल नेटवर्कमध्ये त्यांनी जाहिरात एजन्सी चालवण्याचं काम केलंं. हळुहळु त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि काही काळातच ते मोठे व्यावसायिक म्हणुन प्रसिद्ध होऊ लागले. जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. संजय बियाणी यांच्या हत्येच्या आठ दिवस आधीच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते एका प्रोजेक्टच उद्घाटन केल होतं.
मात्र तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांच्यासह नांदेडमधील अनेक व्यापारी आणि उद्योजकांना दहशतवादी हरविंदर सिंघ रिंधा याच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संजय बियाणी यांना सुरक्षाही पुरववी. त्यानंतर काही काळातच रिंधा गॅंगची दहशतही संपली. डिसेंबरमध्ये पोलिसांनी संजय बियाणी यांची सुरक्षा रक्षक काढून घेतली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.