Phulambri APMC News
Phulambri APMC News Sarkarnama

Phulambri APMC News : फुलंब्रीच्या सभापतीपदी महिलेला संधी, बागडेंनी निर्णय घेतला...

Bjp : चव्हाण या विधानसभेच्या दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.

Marathwada : पंधरा वर्षापासून काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीची (Phulambri APMC News) सत्ता भाजपने यंदा खेचून आणली. फुलंब्रीचे विद्यमान आमदार व ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे सेना युतीने १८ पैकी १४ जागा जिंकत बहुमत मिळवले. आता उद्या (ता.२२) रोजी सभापती, उपसभापतींची निवड केली जाणार आहे. तत्तपुर्वी आज झालेल्या बैठकीत बागडे यांनी सभापती पदावर महिला संचालकाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Phulambri APMC News
Mahaprabodhan Rally Beed News : राऊत, अंधारेंनी सभा गाजवली ; पण ठाकरे गटाला ताकद मिळणार का ?

जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालक अनुराधा चव्हाण यांना सभापती पदाचा मान देण्यात येणार असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. फुलंब्री मतदारसंघातील बाजार समितीसह छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सभापती ठरवण्याचे सर्वाधिकार (Haribhau Bagde) बागडे यांच्याकडेच आहे.

फुलंब्रीचा निर्णय बागडे यांनी झटपट घेतला, मात्र छत्रपती संभाजीनगरचा निर्णय घेतांना त्यांना बरीच कसरत करावी लागत आहे. (Bjp) फुलंब्री बाजार समितीत एक हाती सत्ता मिळविल्यानंतर सभापती भाजपचा तर शिंदे गटाला उपसभापती पद दिले जाणार आहे. (Marathwada) सभापती पदासाठी बागडे नानांचा आशिर्वाद कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो अनुराधा चव्हाण यांना मिळाल्याच स्पष्ट झाले आहे.

उपसभापती पदी दत्तू करपे यांचे नाव अंतिम झाल्याची देखील माहिती आहे. चव्हाण या विधानसभेच्या दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. २०१९ मध्ये देखील त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. बागडे यांनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अकरा जागेवर विजय मिळविला होता. तर त्यांच्यासोबत असलेल्या शिंदे गटातील किशोर बलांडे गटाने तीन जागांवर यश मिळविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in