Mp Owasi-Imtiaz-Ad. Gunratna Sadavarte News, Aurangabad
Mp Owasi-Imtiaz-Ad. Gunratna Sadavarte News, AurangabadSarkarnama

PFI : तपास यंत्रणेच्या पुराव्यांवर बोलणाऱ्या इम्तियाज, ओवेसींची चौकशी करा..

इम्तियाज जलील पुराव्या संदर्भात बोलून एकप्रकारे व्हिक्टीम कार्ड खेळत आहेत, राजकारण करत आहेत. (Gunratna Sadavarte)

औरंगाबाद : पीएफआय संघटनेवर देशातील मोठ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकून शेकडो जणांना अटक केली. यावर एमआयएमचे (Imtiaz Jalil) खासदार इम्तियाज जलील, ओवेसी हे असे कसे म्हणू शकतात? की तपास यंत्रणेकडे पुरावे आहेत का? तपास यंत्रणा या त्यांच्याकडील पुरावे हे संबंधित न्यायालयाला सादर करतील, यांना एखाद्या बैठकीत ते पुरावे आणून देतील का? दहशतवादी कारवायांशी संबंध असलेल्या संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक केलेल्याबद्दल यांना एवढी सहानुभूती का आहे? असा सवाल (Gunratna Sadavarte) अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

तसेच इम्तियाज जलील व असदोद्दीन ओवेसी यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली. अॅड. गुणरत्ने सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. (Aurangabad) यावेळी पीएफआय संघटना व त्यांच्या देश व राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शंका उपस्थीत केली होती.

केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावे असतील तर ही कारवाई योग्य ठरेल. अन्यथा याआधी अनेक कारवायांमध्ये तरुणांची दहा दहा वर्षे तुरुगांत गेली आणि नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले, असे होता कामा नये, अशी भूमिका व्यक्त केली होती. अटक झालेल्या अनेक तरुणांचे नातेवाईक, कुटुंबीय आपल्याला येवून भेटत असल्याचे देखील इम्तियाज यांनी म्हटले होते.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नेमका यावर आक्षेप घेत पुराव्याची चर्चा करणाऱ्या आणि समाजात गैरसमज पसरवणाऱ्या इम्तियाज जलील यांची चौकशी करण्याची मागणी केली. सदावर्ते म्हणाले, इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी पीएफआय संदर्भातील कारवाईवर केलेले भाष्य आणि पुराव्याची जाहीर केलेली चर्चा अत्यंत चुकीची आणि देशविघातक कृत्य करणाऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे आहे.

Mp Owasi-Imtiaz-Ad. Gunratna Sadavarte News, Aurangabad
Abhimanyu Pawar : संततधार नुकसानभरपाई, रिक्त पदासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे

इम्तियाज जलील पुराव्या संदर्भात बोलून एकप्रकारे व्हिक्टीम कार्ड खेळत आहेत, राजकारण करत आहेत. देशाच्या मोठ्या दोन तपास यंत्रणांनी केलेली कारवाई ही पुराव्याशिवाय केली आहे? असे त्यांना म्हणायचे आहे का? अटक करण्यात आलेले लोक निर्दोष आहेत हे ठरवण्याचा किंवा त्यांना क्लीनचीट देण्याचा अधिकार इम्तियाज जलील किंवा ओवेसींना कोणी दिला?

ते न्यायालय ठरवेल. त्यामुळे पुराव्याची चर्चा करून हे काय सिद्ध करू पाहत आहेत. तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप करू नये असे आदशे सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये दिलेले आहेत. पुरावे संबंधित तपास यंत्रणा या न्यायालयात सादर करतील, तुम्हाला एखाद्या बैठकीत त्यांनी पुरावे आणून द्यावेत का? असा सवाल देखील सदावर्ते यांनी केला, तसेच इम्तियाज जलील यांची चौकशी करावी, याचा पुनरुच्चार देखील केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com