चाळीस वर्षांत साधे शौचालयही बांधू न शकणारे विकासाच्या गप्पा मारतात

एकीकडे शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे, तर दुसरीकडे पालकमंत्री विकासाची गंगा आणण्याच्या बाता मारत आहेत. (Mla Smabhaji Patil Nilangekar)
Nilangekar-Deshmukh

Nilangekar-Deshmukh

Sarkarnama

जळकोट ः चाळीस वर्षे सत्तेत असताना शेतकरी, महिलांसाठी लातूरमध्ये साधे शौचालयही बांधले नाही, ते आता विकासाच्या गप्पा मारतात, असा टोला भाजपचे (Bjp) आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना लगावला. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना निलंगेकरांनी पालकमंत्र्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असतांना आरोप-प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व इतर असा संघर्ष भडकला असून एकमेकांची उणीदुणी प्रचार सभांमधून काढली जात आहेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या निलंगेकरांनी जळकोट येथील सभेत महाविकास आघाडीवर कडाडून हल्ला चढवला.

निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना लक्ष्य करत म्हटले की, महाविकास आघाडी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. शहराला तीस कोटी रुपये देतो म्हणून घोषणा केली आहे. तीस कोटी काय तीन लाख रुपयेही दिले नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात, जळकोटचा महामार्ग आम्ही केला. या रस्त्यासाठी मी आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी तो मंजूर केला आहे.

फडणवीस सरकार असताना शेतकऱ्यांचे एकही वीज कनेक्शन तोडले नाही. पण आता सर्रास शेतकऱ्यांची वीज तोडजली जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे, तर दुसरीकडे पालकमंत्री विकासाची गंगा आणण्याच्या बाता मारत आहेत.

<div class="paragraphs"><p>Nilangekar-Deshmukh</p></div>
पंकजा मुंडेचा सूर बदललाः म्हणाल्या, फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा

ज्यांना सत्तेच्या चाळीस वर्षात लातूरमध्ये साधा संडास बांधता आला नाही, ते जिल्ह्याचा विकास काय करणार? असा सवालही निलंगेकर यांनी केला. दरम्यान, भाजपचे नेते सोमेश्वर सोप्पा यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांना चांगले पद देणार असल्याचेही निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com