स्मार्ट सिटीच्या कामांचा मार्ग मोकळा ; महापालिकेला अडीचशे कोटींचे कर्ज मिळाले..

महापालिकेने स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्यूकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचा दुसरा, तिसरा टप्पा, अशी कामे प्रस्तावित केली आहेत. (Aurangabad Municipal Corporation)
Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal CorporationSarkarnama

औरंगाबाद : महापालिकेचे २५० कोटी रुपयांचे कर्ज सेंट्रल बॅक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) आता स्मार्ट सिटीचा उर्वरित १८२ कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास अडसर राहिलेला नाही. (Smart City) स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरित कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले. (Marathwada)

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला २५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा टाकावा लागणार आहे. एकूण एक हजार कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने आत्तापर्यंत २९४ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १४७ कोटी रुपये दिले आहेत. महापालिकेने केवळ ६८ कोटी रुपये भरले आहेत.

केंद्र व राज्य सरकारकडून ३०९ कोटी रुपयांचा हिस्सा मिळणार आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला १८२ कोटीचा स्वहिस्सा भरणे गरजेचे होते. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. २५० कोटींचे कर्ज घेण्यास गेल्या आठवड्यात शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला मंजुरी दिली होती. त्यानंतर २५० कोटी रुपयांचे कर्ज बुधवारी मंजूर झाले.

Aurangabad Municipal Corporation
Aurangabad : दिल्लीत अन् गल्लीतही काॅंग्रेसला आता कोणी विचारेना?

या रक्कमेतून तातडीने स्मार्ट सिटीचे १८२ कोटी रुपये भरले जाणार आहेत. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरित कामे मार्गी लागतील, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या निधीचा हिस्सा मिळेल, या अपेक्षेवर महापालिकेने स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्यूकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचा दुसरा, तिसरा टप्पा, अशी कामे प्रस्तावित केली आहेत. स्मार्ट सिटीत महापालिकेच्या हिश्‍याचा निधी आल्यामुळे आता विकास कामांसाठी ४९१ कोटी रुपयांचा निधी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com