Parli APMC Result News : धनंजय मुंडेची खेळी, शेठ पडले अन् मुनिम निवडून आले..

Dhnanjay Munde : १५ वर्ष मुनीम म्हणून काम केलेल्या भगवान फड यांना धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी दिली.
Parli APMC Result News
Parli APMC Result NewsSarkarnama

Marathwada : राजकारण हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे, असे नेहमीच म्हटले जाते. इथे राजाचा रंक आणि रंकाचा राजा कधी होईल हे सांगता येत नाही. (Parli APMC Result News) असाच काहीसा प्रकार परळी बाजार समितीच्या निवडणुकीत घडला आहे. ज्या शेठकडे मुनिम म्हणून १०-१५ वर्ष कामाला होते, त्याच मालकाचा पराभव करत भगवान फड हे संचालक म्हणून निवडून आल्याचा चमत्कार परळी बाजार समितीत घडला आहे.

Parli APMC Result News
Kannad APMC Result News : आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा धुव्वा ; जाधव-पाटलांच्या शिवशाहीला १६ जागा..

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी कधीकाळी लोहिया शेठ यांच्याकडे मुनिम म्हणून काम केलेल्या फड यांनाआपल्या पॅनलमधून उमेदवारी दिली. (Parli) शेठशी दोन हात करायला लावले अन् एवढेच नाही तर शेठला पराभूत करून फड यांना मुंडे यांनी संचालक बनवले. याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू आहे.

परळी बाजार समिती निवडणुकीत मुंडे बहिण भावांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. (Beed Nesw) तर याच निवडणूकित भाजपकडून, परळी भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष जुगल किशोर लोहिया शेठ यांना व्यापारी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. तर याचं जुगल किशोर लोहिया शेठकडे जवळपास १५ वर्ष मुनीम म्हणून काम केलेल्या भगवान फड यांना धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी दिली.

या प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीत जुगल किशोर लोहिया यांचा दारून पराभव झाला आहे. तर त्यांच्याकडेच मुनीम म्हणून काम केलेल्या भगवान फड यांचा दणदणीत विजय. धनंजय मुंडेंच्या या करिष्म्याने, `परळीत शेठ पडले अन् मुनीम` आले, अशी चर्चा सुरू झाली आहे. भगवान फड यांनी २०१४ च्या निवडणुकीत जुगलकिशोर यांच्याकडील काम सोडले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com