Parbhnai : पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप करणाऱ्या आमदार गुट्टें विरोधात गुन्हा दाखल..

पोलिसांची नाहक बदनामी केल्या प्रकरणी गु.र.नं.४१२\२०२२ कलम ५०० भा.दं.वि. व कलम ३ अधिनियम १९९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Mla Ratnakar Gutte)
Fir Filed Against Mla Ratnakar Gutte News, Parbhani
Fir Filed Against Mla Ratnakar Gutte News, ParbhaniSarkarnama

परभणी : गंगाखेड पोलिस स्टेशनच्या वतीन आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांवर जाहीरपणे हप्तेखोरीचा आरोप केला होता. थेट हप्तेखोरीचा आरोप झाल्यामुळे पोलिसांमध्ये संतापाची भावना होती. (Parbhani) अखेर या प्रकरणी आज पोलिसांनी आमदार गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्याविरोधात बदनामीकारक आरोप केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

२९ आॅगस्ट रोजी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ` तुमचे पोलिस हप्ते घेतात, आधी त्यांना रोखा, असे म्हणत गुट्टे यांनी वादाला सुरूवात केली. यावर आक्षेप घेणाऱ्या व्यासपीठावरील एका पोलिस अधिकाऱ्याला तु मध्ये बोलू नको, असे म्हणत गुट्टेंनी आपले म्हणणे पुढे रेटले होते. (Marathwada) जाहीरपणे आरोप झाल्याने पोलिस अधिकारी व समोर बसलेल्या कर्मचारी, नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रनिक लोढा आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते. गुट्टे यांचा आरोप उपस्थितांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. जाहीरपणे आरोप करून तुम्ही विषयांतर करत आहात. तुमच्याकडे हप्ते घेतल्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या, आम्ही निश्चित कारवाई करू. पण सरसकट सगळ्यांवर हप्तेखोरीचा आरोप करू नका, असा शब्दात गुट्टे यांना उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी सुनावले होते.

Fir Filed Against Mla Ratnakar Gutte News, Parbhani
Sandeep Kshirsagar : बीडमध्ये काका - पुतण्या संघर्ष पेटला : भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

तुम्ही आम्हाला सन्मान दिला, तर आम्ही देखील तुमचा सन्मान करू, असे म्हणत गुट्टे यांनी भाषण आटोपते घेतले होते. पण जाहीरपणे पोलिसांची बदनामी झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये रोष होता. अखेर आमदार गुट्टे यांच्या विरोधात पोलिसांची नाहक बदनामी केल्या प्रकरणी गु.र.नं.४१२\२०२२ कलम ५०० भा.दं.वि. व कलम ३ अधिनियम १९९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com