Parbhani : देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल परभणीकरांच्याच नशिबी का ? हे आहे कारण..

परभणी शहर व जिल्ह्याला मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून इंधन आणावे लागते. विदर्भातून इंधन परभणीपर्यंत येण्यासाठी किंवा मनमाड मार्गे परभणीत इंधन येण्यासाठीचा खर्च प्रचंड आहे. (Parbhani)
Petrol-Diesel Hike In Parbhani
Petrol-Diesel Hike In ParbhaniSarkarnama

परभणी : जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे नेहमी म्हटले जाते, पण सध्या परभणीची चर्चा देशभरात होतेयं ती इथे मिळणाऱ्या सर्वाधिक महागड्या पेट्रोल-डिझेलमुळे. आज देशात कुठेही नाही इतकी किंमत इंधनाची परभणीत (Parbhani) पहायला मिळते. हे महागडे इंधन परभणीकरांच्याच नशिबी का? याचे उत्तर मिळाले आहे. (Marathwada)

परभणी जिल्ह्यात येणारे पेट्रोल हे मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातून म्हणजेच तब्बल साडेतीनशे किलोमीटर अंतरावरून आणावे लागते, त्याचा वाहतूक खर्च सर्वाधिक असल्यामुळेच देशात सर्वात महागडे पेट्रोल (Petrol price) परभणीत मिळते. आज परभणीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १२३ रुपये ४७ पैसे तर डिझेलचा १०६ रुपये ४ पैसे एवढा होता. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना भर उन्हाळ्यात आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत.

रशिया युक्रेनच्या युद्धामुळे इंधन दरवाढीचा हा फटका असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे रशियाकडून भारताला स्वस्त दरात क्रुड आॅईलचा पुरवठा होतोय असे सांगितले जाते. मग नेमकं पेट्रोल महाग कशामुळे तर केंद्र व राज्य सरकारचे स्थानिक कर तर याला कारणीभूत आहेतच. पण लांबवरून पेट्रोल वाहून आणावे लागत असल्याने देखील परभणीत पेट्रोल देशाच्या इतर कुठल्याही शहारापेक्षा जास्त असल्याचे पेट्रोल असोसिएशनचे म्हणणे आहे.

मराठवाड्यात इंधन साठवण्यासाठी आॅलल डेपोची व्यवस्था नाही. त्यामुळे जो तो जिल्हा आपल्याला सोयीचे वाटेल, वाहतूक खर्च कमी होईल याचा विचार करून इंधनाची खरेदी करतो. परभणी शहर व जिल्ह्याला मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून इंधन आणावे लागते. विदर्भातून इंधन परभणीपर्यंत येण्यासाठी किंवा मनमाड मार्गे परभणीत इंधन येण्यासाठीचा खर्च प्रचंड आहे. मनमाडवरून परभणीपर्यंतचे अंतर साडेतीनशे किलोमीटर एवढे आहे.

Petrol-Diesel Hike In Parbhani
Imtiaz Jalil : पवार साहेब, पंतप्रधानांशी मलिकांबद्दल काहीच चर्चा केली नाही का ?

त्यामुळे मनमाडहून निघालेले इंधन परभणीत पोहचेपर्यंत त्याची किमंत देखील मोठ्या प्रमाणात वाढते. सहाजिकच या वाढत्या वाहतूक खर्चा बोझा हा सर्वसामांन्याच्या माथी मारला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

परभणीकरांना मात्र यात वाहतूक खर्चापोटी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. यावर प्रशासन किंवा राजकारण्यांकडून अद्याप तरी कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध आणखी किती दिवस चालेल, त्यातून इंधन दरवाढीचा भडका आणखी किती होईल यावर परभणीतील पेट्रोल किती उंच्चाकी पातळी गाठतो हे अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com