Parbhani : प्रशासकाची नेमणूक टाळणाऱ्या उपनिबंधकास राष्ट्रवादीच्या आमदाराचा झटका..

आदेश असतानाही प्रशासकाची वेळत नेमणूक केली नाही म्हणून दुर्राणी यांनी थेट सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे जिल्हा उपनिबंधकांची तक्रार केली आहे. (Babajani Durani,Parbhani)
Mla Babajani Durani News, Parbhani
Mla Babajani Durani News, ParbhaniSarkarnama

परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापुर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. तरी जिल्हा उपनिबंधकांनी त्या आदेशावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे संतपालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदाराने या उपनिंबधकांची लेखी पुराव्यासह तक्रार सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Mla Babajani Durani News, Parbhani
Ncp : ठोंबरेंना राष्ट्रवादीत प्रवेश देत माझे राजकारण संपवण्याचा सतीश चव्हाणांचा कट..

राष्ट्रवादीचे आमदार बाबाजाणी दुर्राणी (Babajani Durani) यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यानंतर आता उपनिबंधक कार्यालयाकडून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. (Parbhani) परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापुर्वी दिले होते. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

याबद्दल आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन त्यांना जाबही विचारला होता. बाजार समितीवर तात्काळ प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी थेट मुख्यमंत्र्यांचे आदेश डावल्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे देखील उल्लंघन होत असल्याचे दुर्राणी यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.

आदेश असतानाही प्रशासकाची वेळत नेमणूक केली नाही म्हणून दुर्राणी यांनी थेट सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे जिल्हा उपनिबंधकांची तक्रार केली आहे. तसेच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर तात्काळ प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणीही केली आहे.

दुर्राणी यांच्या तक्रारीची दखल घेऊन सहकार विभाग उपनिंबधकांवर काय कारवाई करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दुर्राणी यांच्या तक्रारीबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. त्या अनुषंगाने काही सूचना आल्या तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण जिल्हा उपनिबंधक हुसे यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in