Mp Sanjay Jadhav News : जाधवांच्या मनातले ओठावर आले, आता निष्ठेचे काय ?

Parbhani : शिवगर्जना मोहिमेत जाधव यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करत आपल्याच पक्षाची कोंडी केली.
Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, Parbhani
Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, ParbhaniSarkarnama

Marathwada : पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरेंच्या आदेशाने राज्यभरात शिवगर्जना मोहिम सुरू करण्यात आली. केंद्र सरकार, त्यांच्या दबावाखील काम करणारे निवडणूक आयोग, शिंदेंसह ४० आमदारांनी केलेली गद्दारी यावर प्रहार करत घराघरात ठाकरेंबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा हेतू या मोहिमे मागे होता. पण शिंदेंचे बंड झुगारून संकटाच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली.

Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, Parbhani
Ambadas Danve News : औरंगजेबाची कबर असलेल्या खुल्ताबादचे नावही बदलू, हिंदूंचा अंत पाहू नका..

विशेष म्हणजे शिवगर्जना मेळाव्यातच त्यांनी ठाकरे कसे चुकले हे सांगितले. त्यानंतर राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. गेल्या सात-आठ महिन्यापासून ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या जाधवांनी (Sanjay Jadhav) मनातले ओठावर आणण्यासाठी शिवगर्जना मोहिमेचा मुहूर्तच का निवडला? असा प्रश्न देखील उपस्थीत केला जात आहे. (Shivsena) एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड ज्याला ठाकरे गट गद्दारी म्हणतो, ते कसे योग्य होते हेच जाधव यांनी आपल्या विधानातून सांगण्याचा प्रयत्न केला ?

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नगरविकास खाते दिले, जे आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याला दिले नाही हे सांगत जाधवांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत जाधवांच्या मनातले ओठावर आले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होते, किंवा मग मुलाला मंत्री करायला नको होते अशी खदखद जाधवांच्या मुखातून बाहेर पडली. आता त्यांच्या याच विधानाचा आधार घेत शिंदे गट पुन्हा आमचा निर्णय कसा योग्य होता हे छातीठोकपणे सांगू लागले आहेत.

आमदार संजय शिरसाट यांनी तर ठाकरेंशी एकनिष्ठ असलेला खासदारच हे बोलत असल्याचे सांगत संधी साधली. शिंदे बंडानंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या पाच खासदारांपैकी जाधव हे एक आहेत. मध्यंतरी निवडणूक आयोगाकडे दोन खासदारांनी शपथपत्र दाखल केले नसल्याचा मुद्दा उपस्थितीत झाला होता. तेव्हा संशयाची सुई संजय जाधव यांच्याकडे फिरली होती. मात्र यावर त्यांनी खुलासा करत माध्यमांनी पुरावा दिल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान देत या विषयावर पडदा टाकला होता.

शिवगर्जना मोहिमेत जाधव यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करत आपल्याच पक्षाची कोंडी केली. जाधवांच्या विधानाचा वापर आता शिंदे गटाकडून त्यांच्या यात्रेत निश्चित केला जाईल. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर इतकी महिने एकनिष्ठ राहिलेल्या जाधवांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण केला जाऊ लागला आहे. परभणी जिल्ह्याचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर तो शिवसेनेसाठी कायम गद्दारीचाच राहिला आहे.

Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, Parbhani
Raosaheb Danve News : सिंकदराबाद ते छत्रपती संभाजीनगर पहिली इलेक्ट्रीक रेल्वे धावणार..

मतदार कायम पाठीशी खंबीर, पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची गद्दारी ही जणू या जिल्ह्याची परंपराच बनली आहे. आता हीच परंपरा जाधव यांच्या रुपाने पुढे सुरू राहते की काय? अशी शंका जाधवांच्या या विधाननंतर घेतली जावू लागली आहे. एकीकडे पक्षात पडलेली फूट मागे सारून नव्याने उभारी घेण्यासाठी ठाकरे पिता-पुत्र आणि त्यांचे नेते महाराष्ट्रभर फिरत आहे. तर दुसरीकडे त्यांचाच खासदार ठाकरे कसे चुकले हे शिवगर्जना मोहिमेतून सांगत आहे.

यावरून जाधव यांची पुढची वाटचाल काय असेल? याचा अंदाज येतो. लोकसभा निवडणुका दीड वर्षावर आल्या आहेत. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जागा भाजप लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात तशी तयारी देखील भाजपने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांच्या भूमिकेत अचानक झालेला हा बदल ठाकरे गटासाठी काही शुभ संकेत नाही एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com