Parbhani : जगात जर्मनी अन् देशात परभणी ; माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण याच मातीतून केलं

१९९५ मध्ये मी लाॅच्या द्वितीय वर्षात असतांना तेव्हाच्या कृषी विद्यापीठाच्या जुन्या सभागृहात भाषण केले होते. तेव्हा मोजक्या लोकांपुढे भाषण करणारा मी आता लाखो लोकांसमोर बोलतो. (Dhnanjay Munde)
Minister Dhnanjay Mude
Minister Dhnanjay MudeSarkarnama

परभणी : जगात जर्मनी अन् देशात परभणी ही म्हण आमच्या पाच पिढ्यांना माहित आहे. अशा म्हणी फार कमीवेळा खऱ्या ठरतात, पण माझ नशीब आहे की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि युवानेते, मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुढाकारातून देशातले पहिले सायन्स पार्क वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात होत आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी या निर्णयाचे स्वागत करत परभणीकरांचे अभिनंदन केले.

परभणीची आणि या विद्यापीठाची मातीच अशी आहे, की हिने प्रशासकीय सेवेला मोठे अधिकारी दिले. माझ्या आयुष्यातील पहिले भाषणं देखील मी याच कृषी विद्यापीठाच्या जुन्या सभागृहात केले होते, अशी आठवण देखील मुंडे यांनी यावेळी सांगितली. (Parbhani) राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास येणाऱ्या मराठवाडा कृषी विद्यापीठातील सायन्स पार्कचे भुमीपूजन आज झाले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय जाधव, आमदार डाॅ. राहुल पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले, आज एक विलक्षण योग आमदार राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून आला आहे. आदित्य ठाकरे यांनी देशातील पहिले सायन्स पार्क परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात उभारण्याचा निर्णय घेतला आणि माझे भाग्य की मी जिल्ह्याचा पालकमंत्री असतांना त्याचे भुमीपूजन होतयं.

परभणी आणि कृषी विद्यापीठाची ही मातीच अशी आहे की ज्यामुळे जगात जर्मनी आणि देशात परभणी म्हटले जाते. ही म्हण या निमित्ताने खरी ठरली आहे आणि देशातील पहिले सायन्स पार्क लवकरच इथे आकारात येईल. या निमित्ताने मला एक आठवण आवर्जून सांगावेसे वाटते की माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी याच परभणीच्या मातीतून केले.

Minister Dhnanjay Mude
Thackeray : `रघुकुल रीत सदा चली आयी प्राण जाए पर वचन न जाई`, हे आमचे हिंदुत्व..

१९९५ मध्ये मी लाॅच्या द्वितीय वर्षात असतांना तेव्हाच्या कृषी विद्यापीठाच्या जुन्या सभागृहात भाषण केले होते. तेव्हा मोजक्या लोकांपुढे भाषण करणारा मी आता लाखो लोकांसमोर बोलतो हीच या मातीची किमया असल्याचे मुंडे म्हणाले. आमदार राहुल पाटील यांनी कवि कालिदास उपकेंद्राची मागणी उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली.

यावर त्यांनी मान्यता देतांना मला डीपीडीसीमधून साडेतीन कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यास सांगितले. माझ्या वतीने त्यांनी जरी ही घोषणा केली असती तरी मी नाही म्हणालो नसतो, फक्त सही केली असती. फक्त साडेतीन कोटीच नाही तर या उपकेंद्रासाठी जितका निधी लागेल तो सगळा डीपीडीसीतून दिला जाईल, असे आश्वासन मी देतो, असेही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com