ज्या वटवृक्षाखाली वाढलो, त्याच्यावर घाव घालण्याची माझी प्रवृत्ती नाही ; मी ठाकरेंसोबतच..

आपल्याला कुठलाही घटनात्मक अधिकार व नैतिकता नसतांना लोकसभेतील गटनेते, प्रतोद बदलण्याचे काम आपण करू नये. (Mp Sanjay Jadahv, Parbhani)
Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray News
Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray NewsSarkarnama

परभणी : ` ज्या वटवृक्षाच्या छायेखाली वाढलो, त्याच्यावर घाव घालण्याची माझी प्रवृत्ती नाही. ज्या शिवसेनेने मला अपेक्षेपेक्षा खूपकाही दिले, त्या पक्षाला संकटाच्या काळात कधीही सोडून जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शेवटपर्यंत राहील`, अशी ग्वाही परभणीचे शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav) यांनी दिली.

शिवसेनेतील १८ पैकी १४ खासदार हे शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Parbhani) शिवसेनेचे अनेक खासदार हे नाॅटरिचेबल असून ते दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतच असलेले पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपण कालही (Shivsena) शिवसेनेत होतो, आजाही आहोत आणि भविष्यातही राहू, असे स्पष्ट केले.

जाधव म्हणाले, आमच्या परभणी जिल्ह्याने शिवसेनेला राजकीय पक्षाचा दर्जा मिळवून दिला होता. त्याच परभणी जिल्ह्यातून शिवसेना संकटात असतांना गद्दारी होणे कदापी शक्य नाही. माझ्यासह जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार, पदाधिकारी, शिवसैनिक शिंदे गटासोबत जाणार नाही. आम्ही सदैव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहोत.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेने शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख आणि नगरेसवक ते आमदार, खासदार केले, ज्या पक्षाच्या महाकाय वटवृक्षाखाली आम्ही वाढलो, त्याच वृक्षाच्या मुळावर घाव घालणारी प्रवृत्ती आमची नाही. शिवसेना पक्ष आज संकटात असला तरी काळोखानंतर प्रकाश असतोच आणि तेच शिवसेनेच्या बाबतीत देखील घडेल, याचा मला पुर्ण विश्वास आहे.

Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray News
बांगर यांच्यानंतर खासदार पाटीलही शिंदे गटाच्या वाटेवर ? कार्यालय, बॅंकेवर बंदोबस्त..

शिंदे यांच्यासोबत कोणते खासदार चालले हे मला माहित नाही, पण माझे एकनाथ शिंदे यांना एकच सांगणे आहे, की तुम्हाला जे साध्य करायचे होते, ते तुम्ही केले तेव्हा आता नसते उद्योग करू नये. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात थोडीफार सहानुभूती होती, पण अशा वागण्याने ती देखील नाहीसी होत आहे.

मुळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कुठलाही घटनात्मक अधिकार व नैतिकता नसतांना लोकसभेतील गटनेते, प्रतोद बदलण्याचे काम आपण करू नये. आपली प्रतिमा खराब होत आहे, याचे भान ठेवावे. त्यांनी आता दिल्याघरी सुखी राहावे, असा सल्ला देखील जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com