Parbhani : ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेचा मशाल मोर्चा धडकला..

पीक विमा भरतानाच ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून नोंदणी केलेली असताना सुद्धा त्यांना ऑनलाईन तक्रारी करा, असे सांगण्यात येते. सर्वच बाजूने शेतकरी भरडला जात आहे. (Parbhani Shivsena)
Shivsena March In Farmers Demand In Parbhani News
Shivsena March In Farmers Demand In Parbhani NewsSarkarnama

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हाती मशाल घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळावा व शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या प्रमुख मगाण्यांसाठी या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.

Shivsena March In Farmers Demand In Parbhani News
Marathwada : चिकटगांवकरांचा विरोध, तरीही पंकज ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश..

जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे, लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे, आदी मांगण्याचा यात समावेश होता. (Shivsena) याबाबतचे निवेदन देखील (Parbhani) परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने परभणीसह राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.

परभणी जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके जोमात आली. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने उर्वरित पिकेही खराब झालीत. यामुळे दुबार पेरणी करूनही नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही शासनाने अद्याप जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.

तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देखील दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर मागील वर्षाचे अनुदानही मिळालेले नाही. जिल्ह्यातील ५०% शेतकऱ्यांचे विम्याचे दावे देखील विमा कंपन्या मार्फत फेटाळले गेले. यावर्षी जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शेतीसाठी सोडले जात नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १६ तास विजेचे भार नियमन असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही.

पीक विमा भरतानाच ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून नोंदणी केलेली असताना सुद्धा त्यांना ऑनलाईन तक्रारी करा, असे सांगण्यात येते. सर्वच बाजूने शेतकरी भरडला जात असल्याचे वास्तव त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडले. यावेळी आमदार व परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रविंद्र वायकर, ज्योतिताई ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in