Beed : जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी पंकजाताईंना पुन्हा पालकमंत्री पद मिळावं..

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत तरी पंकजा यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षाअसल्यानेच खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजा यांना पालकमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली असावी. (MP Pritam Munde)
Bjp Leader Pankaja-Pritam Munde News, Beed
Bjp Leader Pankaja-Pritam Munde News, BeedSarkarnama

बीड : शिंदे-फडणवीस सरकारने नुकतेच राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. मंत्रीमंडळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मिळून वीसच मंत्री असल्यामुळे एका मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. (Beed) बीड आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सावे हे फडणवीसांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. असे असतांना अंबाजोगाईमधील एका कार्यक्रमात खासदार डाॅ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मात्र वेगळीच अपेक्षा व्यक्त केली. भाजपचे अंबाजोगाई येथील नेते अक्षय मुंदडा यांच्या भाषणातील मागणीचा उल्लेख करत प्रीतम मुंडे यांनी देखील पकंजा मुंडे (Pankaja Munde) या पुन्हा बीडच्या पालकमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

अंबाजोगाई तालुका हा चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गांनी वेढला गेला आहे. कुठल्याही तालुका, जिल्ह्याच्या विकासात दळणवळण, रस्त्यांचे मोठे योगदान असते. पंकजा मुंडे पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती मिळाली. परतु गेल्या काही काळात राहिलेला बॅकलाॅग भरून काढण्यासाठी पुन्हा पंकजाताई यांना बीडचे पालकमंत्री पद मिळावे, अशी माझी देखील इच्छा असल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आजच भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या समर्थकांना तयारीला लागा, असे आवाहन केले आहे. दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतांनाच पंकजा मुंडे यांनी पुन्हा बीडचे पालकमंत्री करण्याची मागणी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Bjp Leader Pankaja-Pritam Munde News, Beed
Imtiaz Jalil : कुण्या अधिकाऱ्याला वाटले म्हणून नको ; पुरावे असतील तर निश्चित कारवाई करा..

राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. त्यांच्या काळात जिल्ह्यात काळाबाजार, गुंडगिरी, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे आरोप आणि टीका प्रीतम आणि पंकजा मुंडे या दोघींकडून सातत्याने केली गेली. आता राज्यात सत्तातंर होवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. या गेल्या तीन वर्षाच्या राजकीय घडामोडीत परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पक्षाने बाजूला टाकल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला गेला.

पंकजा यांच्यावर पक्षनेतृत्वाने अन्याय केल्याची भावना स्वतः पंकजा यांनी देखील अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली होती. पक्षाने त्यांना आमदारकी, राज्यसभेची संधी देण्याऐवजी संघटनेचे जबाबदारी टाकली. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक केली. पण पंकजा समर्थकांना ही जबाबदारी म्हणजे पंकजा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नच वाटला.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत तरी पंकजा यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत. कदाचित यामुळेच खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजाताईंना पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली असावी, अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com