पंकजाताई हा भाजपचा विजय म्हणता, मग केजमध्ये उमेदवार का मिळाला नाही?

मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आहे, राज्यात राष्ट्रवादी १, शिवसेना २ नंबरवर तर भाजपचा तिसरा क्रमांक लागतो. (Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde-Pankaja Munde
Dhnanjay Munde-Pankaja MundeSarkarnama

औरंगाबाद ः नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना या दोन पक्षांनी चांगले यश मिळवले आहे. (Pankaja Munde) तर काही भागात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. (Dhnanjay Munde) बीड जिल्ह्यातील पाच पैकी तीन नगरपंचायतीवर भाजपचा (Bjp) झेंडा फडकला आहे. या यशानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी हा पक्ष आणि निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.

यावर सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. पंकजा मुंडे म्हणतात हा भाजपचा विजय, मग तुम्हाला केजमध्ये उमेदवार का मिळाले नाहीत? असा सवाल करत नगरपंचायत निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष ठरल्याचा दावाही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बीडसह राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकाला संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले, पंकजा मुंडे म्हणतात हा भाजपचा विजय आहे, मग केजमध्ये भाजपला एकही उमेदवार उभा का करता आला नाही, तिथे राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या आहेत.

Dhnanjay Munde-Pankaja Munde
पंकजा मुंडेचे कमबॅक, तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा; धस ठरले किंगमेकर

केजमध्ये पक्षाचे चिन्हं देण्यासाठी तुम्हाला उमेदवार मिळाला नाही. मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आहे, राज्यात राष्ट्रवादी १, शिवसेना २ नंबरवर तर भाजपचा तिसरा क्रमांक लागतो. यावरून राज्यात काय वातावरण आहे हे कळते, राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याचा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com