Chandrashekhar Bawankule : पंकजाताई आमच्या नेत्या, त्यांना पक्षातीलच एक गट बदनाम करतोय..

Pankaja Munde : त्या नाराज नाहीत, हे त्यांनी वारंवार स्पष्ट करून देखील पुन्हा तोच विषय समोर आणला जातो.
Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule News, Jalna
Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule News, JalnaSarkarnama

Jalna News : पंकजा मुंडे नाराज आहेत, असे सांगत त्यांना आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न पक्षातीलच एक गट करतोय, असा गंभीर आरोप (Bjp) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जालना येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप आघाडीचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमासाठी बावनकुळे जालन्यात आले होते.

Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule News, Jalna
30-30 Scam : नोटबंदी झाली, अन राठोडला पैसे येणे बंद झाले..

यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हा आरोप केला. बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे त्यांना भाषणाची संधी देणे हे माझे कर्तव्यच आहे. (Chandrashekhar Bawankule) पण त्यांच्या नाराजीच्या बातम्या पक्षातीलच एका गटाकडून सातत्याने पसवल्या जात आहेत.

त्या नाराज नाहीत, हे त्यांनी वारंवार स्पष्ट करून देखील पुन्हा तोच विषय समोर आणला जातो. यातून पंकजा आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न एक गट करतो आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सरकारच्या अस्तित्वाबद्द प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत? यावर ठाकरे गटाकडून आणि विरोधकांकडून अशा अफवा पसरवल्या जात आहेत.

मुळात विरोधकांकडील काही आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सूक आहेत. उद्या पुन्हा बहुमत सिद्ध करायची वेळ आली तर आमच्याकडे १८४ पेक्षा जास्त आमदारांची संख्या असले, असा दावाही बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या रक्तात विकास नाही, त्यामुळे त्यांच्या काळात राज्य पिछाडीवर गेले. पण आता शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार गतीमान वेगाने विकासाकडे वाटचाल करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com