फडणवीस, दरेकरांविरुद्ध घोषणाबाजी करत पंकजा समर्थकांनी दुसऱ्यांदा ताफा अडवला..

बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दरेकर यांनी हजेरी लावली. (Beed Bjp)
फडणवीस, दरेकरांविरुद्ध घोषणाबाजी करत पंकजा समर्थकांनी दुसऱ्यांदा ताफा अडवला..
Pravin Darekar- Pankaja MundeSarkarnama

बीड : राज्यसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. भाजपचे धनंजय महाडिक हे तिसरे उमेदवार देखील विजयी झाल्याने भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी केली आहे. या विजयाचा जल्लोष भाजपकडून ठिकठिकाणी केला जात आहे. परंतु बीड जिल्ह्यात आलेल्या भाजप (Bjp) नेत्यांना मात्र पकंजा मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे पंकजा (Pankaja Munde) समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतूनच काही समर्थकांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या गाड्यांचा ताफा बीड-उस्मानाबाद सीमेवर अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर दुसऱ्यांदा बीड (Beed) शहरात देखील दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. दरेकरांनी आधी ताफा अडवला नसल्याचे सांगितले होते. परंतु शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या घरून परततांना दरेकरांचा ताफा पंकजा समर्थकांकडून पुन्हा अडवण्यात आला.

एवढेच नाही तर एक कार्यकर्ता चक्क दरेकर यांच्या गाडीसमोरच पडला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यावेळी समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील घोषणा देण्यात आल्या. पंकजा मुंडे यांना भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप पंकजा समर्थकांकडून केला जातो. यावेळी विधान परिषदेच्या उमेदवारांसाठीच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. परंतु भाजपच्या केंद्रीय समितीने त्यांच्या नावावर फुली मारत नवख्या उमेदवारांना संधी दिली.

त्यानंतर पंकजा समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगर जिल्ह्यात तर एका समर्थकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार देखील उघडकीस आला. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे नेते जिल्ह्यात आल्यामुळे पंकजा समर्थकांचा राग अधिकच उफाळून आला. आधी पारगाव येथ तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Pravin Darekar- Pankaja Munde
Bjp : राऊत, वडेट्टीवार घरगडी, पण अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत...

विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दरेकर यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघत असताना पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गाडी न रोखल्यानं पंकजा समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

भाजपकडून मुंडे बाहिणींवर अन्याय होतोय,यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आला. या सगळ्या घडामोडींवर मुंडे भगिनी मौन बाळगून आहेत. त्यांची ही शातंता वादळापुर्वीची शांतता असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in