शेतकरी पाण्यात असताना राष्ट्रवादीचे सोहळे; पंकजा मुंडेंचा पालकमंत्र्यांवर निशाणा

बीड जिल्हाच काय पण मराठवाडा अधांतरी आहे.
Pankaja Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde, Dhananjay Mundesarkarnama

बीड : मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सोहळे सुरु होते, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांनी तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. तसेच केवळ पिकांना नाही तर वाहून गेलेली जमीन, गुरंढोरे, मालमत्तेचे नुकसान यासाठीही पॅकेजची घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत बोत्या.

Pankaja Munde, Dhananjay Munde
खासदार हेमंत गोडसे म्हणाले, `रस्ता दुरूस्ती होईपर्यंत टोल बंद करा!`

पंकजा म्हणाल्या, पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सर्वात आधी प्रशासन आणि शासन यांनी काम केले पाहिजे. पालक मंत्र्यांनी प्रत्येक बारीक विषय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यापर्यंत नेला पाहिजे. आधी पालकमंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यात गेले पाहिजे. पहिले खासदार प्रीतम मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्याच्या बांधावर गेले. प्रीतम मुंडे बांधावर होत्या त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठमोठे सोहळे चालले होते, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

मुंडे म्हणाल्या, आमचा आक्षेप राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना नाही. त्यांनी २ वर्षांपासून विमा का दिला नाही. शेतकऱ्यांना कोणतही अनुदान का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी केला. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वेळोवेळी बोंड अळी आल्यावर अनुदान, नुकसान भरपाई, अतिवृष्टीची मदत मिळत होती. यांनी अट्टाहास करुन बँकेवर प्रशासक आणला त्यामुळे आज बँकेची पगार द्यायचीही परिस्थिती नाही. आम्ही तोट्यातील बँकही सुरळीतपणे चालवत होतो. बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळत होती.

Pankaja Munde, Dhananjay Munde
पंकजा मुंडेंना मोठा धक्का; समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड जिल्हाच काय पण मराठवाडा अधांतरी आहे. अतिवृष्टीसाठी तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. हे पॅकेज केवळ पिकांसाठी नाही तर वाहून गेलेल्या जमिनीसाठी, मालमत्तेच्या नुकसानासाठी, गुरढोर वाहून केले त्यासाठी ही दिले पाहिजे. अन्नधान्य भिजून गेले त्यामुळे लोकांना खाण्यासाठी पंचायत होणार आहे. त्यामुळे त्यांना त्याचा पुरवठा करण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com