Pankaja Munde : पंकजांची बदनामी कोण करतंय? बावनकुळेंनी विरोधकांना धरले धारेवर!

Pankaja Munde : पंकजांच्या बदनामीसाठी विरोधकांचं पाठबळ
Pankaja Munde : Chandrashekhar Bawankule
Pankaja Munde : Chandrashekhar BawankuleSarkarnama

Pankaja Munde : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा एका सभेतला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंकजांना बोलू दिले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र बावनकुळे यांनी व्हिडीओत फेरफार केल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, "पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये एक ग्रुप कार्यरत आहे. याला विरोधकांचं पाठबळ आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला. ते बीड मध्ये बोलत होते.

Pankaja Munde : Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar : हिंदू राष्ट्र समितीच्या धनंजय देसाईंची अजित पवारांवर अर्वाच्च भाषेत टीका; म्हणाले...

बावनकुळे म्हणाले, "मी याआधीही सांगितलं, आजही सांगतोय पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांना माझ्यापूर्वी बोलायचं होतं. अध्यक्षीय भाषण त्यांना करायचं होतं. मात्र मी त्यांना विनंती केली की, आधी मी बोलतो, मग तुम्ही बोला.कारण तुम्ही राष्ट्रीय नेत्या आहात. त्यांनी माझं बोलणं ऐकलं. त्या माईकपर्य़ंत आल्या, त्यांनी माझी विनंती मान्य केली. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत म्हणून त्यांना सन्मान देत शेवटचं भाषण त्यांनी करायला सांगितलं, असे बावनकुळे म्हणाले.

"काही लोकांनी व्हिडीओत फेरफार केला आहे, याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. पोलिसांनी कारवाई केली. बीड जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांनी असा एक ग्रुप तयार केलाय, यातून ते पंकजा मुंडेंना वारंवार बदनाम करायचं काम करत आहेत. भाजपचे नेते आले, मी किंवा देवेंद्र फडणवीस आले तर पंकजा यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायचा त्यांचा प्रयत्न असतो," असेही बावनकुळे म्हणाले.

Pankaja Munde : Chandrashekhar Bawankule
Bycott Movies trend; बायकॉट अस्त्र फेल...दर दुप्पट तरीही `पठाण` हाऊसफुल्ल!

"पंकजा यांच्या रक्तारक्तात भाजपा आहे. पंकजांनी परवा माझ्या दौऱ्यामध्ये ज्याप्रमाणे ऊर्जा निर्माण केली. त्यांनी सांगितलं की शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस एक करा, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com