पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी मिळेल, वर्षभरात स्कोप आहे

(Chandrakat Patil said, Bavankule has got the opportunity, Pankaja, Tawde will also get it).विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. पंकजा या राष्ट्रीय सचिव, एका राज्याच्या प्रभारी आणि भाजप कोअर कमिटीच्या सदस्य आहेत.
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

औरंगाबाद ः राज्यातील रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागा आणि एका पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली. पण विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना संधी कधी मिळणार? या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना लवकरच संधी मिळेल, या वर्षात भरपूर स्कोप आहे, अशी गुगली टाकली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यामुळे विधान परिषद किंवा राज्यसभेच्या रिक्त जागांवर नियुक्तीचा विषय आला तेव्हा पंकजा मुंडे यांच्यासह या दोन्ही नेत्यांच्या नावांची नेहमीच चर्चा होत गेली.

विशेषतः पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतले जाईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता, पण आधी राज्यसभा आणि त्यानंतरच्या विधान परिषदेत पंकजा मुंडे यांच्याच जवळच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. डाॅ. भागवत कराड राज्यसभेवर तर रमेशअप्पा कराड यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले.

बावनकुळे, तावडेंचा तर विचारच झाला नाही. पंकजा मुंडे यांच्यासह तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीवर घेऊन त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्ष डावलत असल्याची भावन त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अजूनही कायम आहे. विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या सहा जागा व एका पोटनिवडणुकीत देखील यापैकी केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली.

त्यामुळे सहाजिकच विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला. यावर पाटील म्हणाले, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. पंकजा या राष्ट्रीय सचिव, एका राज्याच्या प्रभारी आणि भाजप कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना डावलले असे म्हणता येणार नाही.

Bjp Leader Chandrakant Patil
कायदा मोडायचा नाही, पण आम्ही आता तर मुंबईला येणारच

विनोद तावडे यांच्यावर देखील पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे, हरयाणा राज्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे, या शिवाय महाराष्ट्रातील मिडियाचे प्रमुख म्हणून देखील ते काम पाहतात. असे असले तरी प्रत्येकाला राजकाराणातील संवैधानिक पद हवे असते. आता बावनकुळेंना संधी मिळाली आहे, पंकजा मुंडे,विनोद तावडे यांना देखील ती मिळेल. येत्या वर्षभरात भरपूर स्कोप असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com