Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून दूर सारण्याचा प्रयत्न?

Pankaja Munde : भाजपच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप
Bjp  Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

Pankaja Munde : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (JP Nadda) हे उद्या (२ जानेवारी २०२३) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नड्डा हे चंद्रपूर येथे त्यांचे आगमन होणार आहे. चार्टर्ड विमानाने सकाळी ११ वाजता ते चंद्रपूरच्या विमानतळावर दाखल होतील. चंद्रपूरमध्ये नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या कार्यक्रमात भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याचे समजते, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bjp  Leader Pankaja Munde
J P Nadda : भाजपच्या 'मिशन १४४' ची सुरुवात महाराष्ट्रातून होणार; जे.पी.नड्डा 'या' मतदारसंघात घेणार सभा

जे. पी. नड्डा यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. खुशाल मुंडे यांनी केला आहे. मुंढे यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Bjp  Leader Pankaja Munde
Andhra Pradesh : चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू,अनेक जखमी!

'भाजपने ध्यानात ठेवायला पाहिजे की, या महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशात बहुजन जनतेची एकजूट भाजपच्या पाठीशी उभं करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलेली आहे. आणि मुंडे साहेबांप्रमाणे पंकजा मुंडे या ही भाजपात काम करत आहेत. परंतु त्यांना भाजपचे काही नेते, बाजूला करत आहेत. असेही खुशाल मुंडे म्हणाले.

'2024 मध्ये भाजपला याची किंमत मोजावीच लागणार, हे लक्षात ठेवा. बहुजन- माळी, धनगर, वंजारी, बंजारा, नाभिक, व ओबीसी भटके विमुक्त समाजाचा भाजपला पाठीशी उभा राहावा असे वाटत असेल, तर पंकजा मुंडे यांना बाजूला करून चालणार नाही. याच पद्धतीने जर वर्तवणूक असेल, तर एकूणच राज्यभरात माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीच्या वतीने जनजागृती संवाद यात्रा सुरू करण्यात येईल, असा इशाराही माधवबन वतीने डॉ. मुंडे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com