पंकजा मुंडेंना डावलताच कार्यकर्ते आक्रमक! थेट भाजप कार्यालयावर धडकले

ओबीसी नेत्यांना संपवण्याचा भाजपचा डाव
Pankaja Munde News, Vidhan Parishad Election 2022
Pankaja Munde News, Vidhan Parishad Election 2022Sarkarnama

मुंबई : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आज संतप्त मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालवरच मोर्चा काढून पक्ष नेतृत्वाला जाब विचारला. यामुळं भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. (Vidhan Parishad Election 2022 news)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप (BJP) नेतृत्वाने उमेदवारी नाकारल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडेंना संधी देण्यात न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. औरंगाबादमध्ये मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी आज थेट पक्षाच्या कार्यालयावरच मोर्चा काढला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलीस गाड्यात घेऊन जात असतानाही ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला ओळख मिळवून दिली. आता त्यांची लेकीला डावललं जातं आहे. पंकजाताईंना डावलणं भाजपला आगामी काळात परवडणार नाही, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांवरही निशाणा साधला. (Pankaja Munde News)

Pankaja Munde News, Vidhan Parishad Election 2022
घोडेबाजाराचा आरोप पडला महागात! 'आप'चे प्रभारीच आले अडचणीत

पंकजा मुंडेंना डावलणं हा संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान आहे. पुढील काळात ओबीसी समाज याला उत्तर देईल. ओबीसी नेत्याला संपवण्याच काम भाजप करत आहे. अशा नेत्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहोत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. याचवेळी सोशल मीडियावरही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुंडे समर्थक कार्यकर्ते भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. ताई नाही तर भाजप नाही, अशी पोस्ट सोश मीडियावर करण्यात आल्या आहेत. याचबरोबर कमळ हद्दपार करण्याचा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Pankaja Munde News, Vidhan Parishad Election 2022
राज्यसभेसाठी घोडेबाजार? एका आमदारासाठी तब्बल 10 कोटींचा भाव फुटल्याचा गौप्यस्फोट

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी दिली आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे यांच्या नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. तिघेही नेते फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com