मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा : पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळणार की जनतेच्या मनातील आमदार होणार?
मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा : पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
Pankaja Munde|Sarkarnama

बीड : मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे असं म्हणतं त्यांनी विधानपरिषद निवडणुसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. (Pankaja Munde latest News)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील.

भाजप पंकजा मुंडेंना पुन्हा ताकद देणार का?

सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि राज्यात तापलेल्या ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला. हा पराभव अंतर्गत राजकारणातून झाल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र या पराभवापासून पंकजा मुंडे एकट्या पडल्याचे चित्र आहे.

पंकजा मुंडे यांनी त्यांची राज्यातील पक्षनेतृत्वाविषयीची नाराजीही सातत्याने बोलून दाखवत आपल्या मनातील राग आणि खदखद व्यक्त केली आहे. मागील दसरा मेळाव्यातही त्यांनी स्वपक्षीयांवर जाहीर टीका केली होती. अशातच आता ओबीसींचं राजकीय आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यामुळे पक्ष आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देवून पुन्हा ताकद देणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in