मी डाव्या बाजूला गेले तर तुम्ही माझ्या सोबत आहेत का? पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य

Pankaja Munde : परळीत पंकजा मुंडे यांचे जोरदार भाषण
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama

Pankaja Munde : बीड : घरी बसणारा पैकी मी नाही, मी डाव्या बाजूला गेले तर तुम्ही माझ्या सोबत आहेत का? असा सवाल जाहीर भाषणात भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे बीडमध्ये बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, संघर्षासाठी माझा पाठीचा कणा कधीही वाकत नाही. झुकून गंभीर होऊन घरी बसणारा पैकी मी नाही. माझ्याबरोबर तुम्ही आहेत ना, मी उजव्या बाजूला गेले तर डाव्या बाजूला गेले तर वर गेले तर खाली गेले तर माझ्या सोबत आहेत ना, असे पंकजा यांनी विचारले असता कार्यकर्त्यांनी साद देत सोबत राहणार अशा घोषणा दिल्या.

Pankaja Munde
नितीन गडकरींचे भाकीत : ... तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाचीही संधी मिळेल

संघर्षाला मी घाबरत नाही, संघर्षाचा वसा माझ्या रक्तातच आहे. संघर्ष केल्या शिवाय नावच होत नाही. सध्या चर्चा कुणाची आहे. संघर्षाची चर्चा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी घणाघात केला. तसेच मी थकणार नाही मी रुकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, असे म्हणत मुंडे यांनी गर्भित इशारा दिला. यामुळे परळी मधील पंकजा मुंडे यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

Pankaja Munde
'राज्याचे मंत्री असताना ते संगमनेर पलिकडे गेलेच नाहीत'

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुंडे साहेबांच्याही वाट्याला पराभव आला होता. तो पराभव माझ्या देखील वाट्याला आला. त्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जोपर्यंत मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझा बाल हि बाका होणार नाही. तिरंगी लढत झाली असती तर सीट लागली असती. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com