मी तुमच्या मनात असेल तर... मला नरेंद्र मोदीही संपवू शकत नाहीत...पंकजा मुंडे

अंबाजोगाईमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मोठे विधान
Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Bjp Leader Pankaja Munde News, BeedSarkarnama

मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि म्हणाल्या मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनावर राज्य केले, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) उपस्थित होत्या.

Bjp Leader Pankaja Munde News, Beed
शिवसेना कुणाची? आता लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात

काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे आणि तेच राजकारण नरेंद्र मोदी यांना संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मी तुमच्या मनात असेल तर मला कोणी संपवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Beed : जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी पंकजाताईंना पुन्हा पालकमंत्री पद मिळावं..

राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. राजकारण हे करमनुकीचे साधन होत आहे. गणेश मंडळ करा, नवरात्री करा, दांडीया करा, गरबा करा हे काय चाचले हे माझे काम नाही. असे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ काम संस्कृतीला जपने आहे. पण माझे काम देशाला काहीतरी देणे आहे. याचाच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in