पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास उघडे, पण..

(Dasra Melawa Pankaja Munde)मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून लढा उभारणार असल्याचे देखील सांगतिले. पंकजा मुंडे म्हणाल्या.
Bjp Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

सावरगाव घाट ः यापुढे माझे दरवाजे तुमच्यासाठी २४ तास उघडे असतील, पण सेल्फीसाठी नाही, तर जनतेच्या कामसाठी, असे म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात अनेक संकल्प केले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून धार्मिकस्थळे, रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प या निमिताने घेण्यात आला. या शिवाय आपल्या जवळचा २९ वर्षाचा कार्यकर्ता कॅन्सरने हिरावून नेला, तेव्हा यापुढे गावागावात जाऊन व्यसनमुक्ती अभियान राबवून तंबाखूच्या पुड्यांची होळी करण्याचा शब्द देखील त्यांनी उपस्थितीत जनसमुदायाकडून घेतला.

सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अडीच तास उशीरा सुरू झालेल्या या मेळाव्याला रखरखत्या उन्हात हजारोंची गर्दी होती. या गर्दीला संबोधित करतांना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून लढा उभारणार असल्याचे देखील सांगतिले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आज दसरा मेळाव्यातून तुम्ही काय संदेश देणार हे मला मिडियाचे लोक विचारत होते, मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला अपेक्षित आहे. गेल्या दसरा मेळाव्याला आपण मुलींसाठी संकल्प केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला अभिप्रेत असे काम करण्याचे माझ्या मनात होते. आपल्या भागातील मंदिर, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, महाविद्यालय अस्वच्छ असतात. तेव्हा आजपासून सर्व जाती-धर्माची पार्थनास्थळे, रुग्णालये आणि विद्यालये स्वच्छ ठेवण्याचा संकल्प आपण हाती घेऊयात.

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा दोन समाजांमध्ये भांडणे लावणण्याचे प्रकार सुरू आहेत. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण पाहिजे आहे, तर ओबीसी समाजाला राजकीय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणासाठी आपण लढा देणार आहोत. मराठा आणि ओबीसी म्हणजेच बहुजन असे आपण मानतो, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. या शिवाय दुष्काळ, अतिवृष्टी, ऊसतोड मजुर, महिला सुरक्षा या मुद्यावर देखील आपण राज्यभरात दौरे करून आवाज उठवणार आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष

आज सायंकाळी शिवसेनेचा देखील दसरा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे माझे देखील लक्ष आहे. तीन पक्षांचे राज्यातील आघाडी सरकार एकमेकांना खूष करतांना जनतेला मात्र दुःखी करत असल्याची टीका पंकजा यांनी केली. उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यातून जनतेच्या कल्याणासाठी कोणते निर्णय घेतात याकडे आपले लक्ष्य असल्याचे पंकजा म्हणाल्या.

Bjp Leader Pankaja Munde
तुम्ही उन्हात असतांना आम्ही सावलीत बसणार नाही; प्रत्येक संकटात सोबत राहू

सरकार पडणार, सरकार खंबीर या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या म्हणजेच स्वपक्षाच्या विधानांवर देखील पंकजा यांनी टीका केली. सरकार आता पडणार, तेव्हा पडणार याचे मुहूर्त ठरवण्याच्या कामातून आता विरोधी पक्षाने बाहेर पडले पाहिजे. आपण विरोधी पक्षात आहोत हे स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, तर सत्ताधाऱ्यांनी देखील सरकार भक्कम आहे हे सांगण्यात वेळ न घालवता राज्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com