Pankaja Munde Parikrama Rally : धाराशिव दौऱ्यात पंकजा मुंडेंनी ठेवली जुन्या सहकाऱ्याची आठवण...

BJP Political News : भाजपचे संघटनात्मक महत्त्वाचे पद नसले तरी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ता प्रथम असा संदेश दिला.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama

Dharashiv Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची `शिवशक्ती` परिक्रमा यात्रा आज धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्या बीडमध्ये दाखल झाली. (Pankaja Munde Rally) पंकजा यांच्या या परिक्रमा यात्रेकडे भाजपने पाठ फिरवली अशी चर्चा असली तरी त्यांना मिळणारा पाठिंबा उत्साह वाढवणारा आहे. या यात्रेतून आपले कोण? हेदेखील पंकजा मुंडे पारखून घेत असल्याची चर्चा आहे.

Pankaja Munde News
Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @जालना : जरांगेंची प्रकृती खालावली, पोलिसांनी शक्ती वापरली अन् घात झाला... भाग-३

धाराशिवमध्ये (Osmanabad) परिक्रमा यात्रा पोहाेचली तेव्हा मुक्कामासाठी त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या घराला पसंती दिली. दत्ता कुलकर्णी यांच्या घरी मुक्काम करत त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिला. (BJP) कुलकर्णी कुटुंबानेदेखील त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांचे पेंटिंग भेट म्हणून दिले. स्वतः पंकजा यांनी आपल्या फेसबुकवर दत्ता कुलकर्णी यांच्या कुटुंबासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) काल धाराशिवमध्ये दाखल झाल्या. अणदूर, नळदुर्गमार्गे तुळजापूरला जाऊन त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे पक्षीय तसेच कौटुंबिक जुने सहकारी दत्ता कुलकर्णी यांच्या घरी मुक्काम केला. दत्ता कुलकर्णी हे सुजीतसिंह ठाकूर यांना आपले राजकीय गुरू मानतात. आजवर ठाकूर यांच्याच पुढाकाराने पक्षाने त्याना अनेक संधी दिल्याचे ते अनेक वेळा बोलून दाखवतात.

सुजीतसिंह ठाकूर यांची स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख होती. पुढे त्यांनी पंकजा मुंडेंना आपल्या नेत्या मानून काम सुरू केले. संघटनात्मक पातळीवर ठाकूर यांना भाजपने सरचिटणीस पदाची अनेक वर्षे संधी दिली. तसेच महायुतीच्या काळात त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्याचवेळी दत्ता कुलकर्णी जिल्हाध्यक्षपदी काम करत होते. या आधी दत्ता कुलकर्णी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते, तेव्हा पंकजा मुंडे या युवा मोर्चाच्या अध्यक्ष होत्या.

त्यांनीच दत्ता कुलकर्णी यांची युवा मोर्चाच्या संघटनवाढीसाठी निवड केली होती. तेव्हापासून पंकजा मुंडे व दत्ता कुलकर्णी यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय पंकजा यांच्या परिक्रमा यात्रेतून जिल्ह्याला आला. या धावत्या दौऱ्यातही दत्ता कुलकर्णी यांना पंकजा यांनी सहभागी करून घेतले. दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला तेव्हाच कुलकर्णी यांच्याकडे मुक्कामाचा दिवस निश्चित करण्यात आला होता.

Pankaja Munde News
MP Sanjay Raut On G-20 Summit : मोदींनी केलं त्यात नवल काय ? नेहरू, इंदिरा गांधींनी अशा बैठका घेतल्या आहेत..

भाजपचे राज्यनेते जिल्ह्यात विशेषतः शहरात आल्यानंतर ते राणा पाटील यांच्याकडेच पाहुणचार घेतात. आताही पंकजा मुंडे यांनी त्यांना पाहुणचाराची संधी दिली असली तरी मुक्काम मात्र आपल्या जुन्या सहकारी असलेल्या कुलकर्णी यांच्याकडे करण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे आजही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसले. सध्या दत्ता कुलकर्णी यांच्याकडे भाजपचे संघटनात्मक महत्त्वाचे पद नसले तरी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ता प्रथम असा संदेश दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in