पंकजा मुंडे रमल्या शाळकरी मुलांमध्ये; चिमुकल्यांसह स्कूलबसमधून प्रवास!

Pankaja Munde : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी "ताई, ताई" म्हणून साद घातली. हात उंचावून सर्व चिमुकल्यांनी त्यांना आवाज दिला.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

बीड : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने माध्यमांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आता एका वेगळ्या अनोख्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या चिमुकल्या शाळकरी मुलांमध्ये, रमून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंडे यांनी चिमुकल्या मुलांसह स्कूल बसमध्ये प्रवास देखील केला.(Latest Marathi News)

मुंडे या परळी शहरातून जात असताना, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्या होत्या. याचदरम्यान समोरून एक शाळेची बस आली. यावेळी मुंडेंना पाहून या शाळेच्या बसमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी "ताई, ताई "म्हणून साद घातली. हात उंचावत सर्व चिमुकल्यांनी त्यांना आवाज दिला. या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून, मुंडेंनी देखील त्यांच्यात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.

Pankaja Munde
आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक !

मुंडेंनी त्या शाळेच्या बसमधील विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. बसमधील प्रत्येकच विद्यार्थ्यांनी मुंडेंशी हस्तांदोलन करण्याचा आग्रह दिसून आला. या चिमुकल्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुंडेंनी चक्कं स्कूल बसमध्येच प्रवेश केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये बसून काही अंतर प्रवास करत, विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी मुंडेंनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत, प्रत्येकाची चौकशी करत, या चिमुकल्यांचा उत्साह वाढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com