Pankaja Munde Speech: व्यापारी देशाच्या पाठीचा कणा, त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे..

Marathwada Chamber Of Trade & Commerce - Beed: देशाच्या प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
Bjp Leader Pankaja Munde News
Bjp Leader Pankaja Munde News Sarkarnama

Beed News: व्यापारी हे देशाच्या पाठीचा कणा आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे असतील त्या सोडविण्यासाठी तुमची प्रतिनिधी म्हणून मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन (Bjp)भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिले. त्या बीडमधील मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स व विविध व्यापारी महासंघ परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा व्यापारी परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.

Bjp Leader Pankaja Munde News
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज ? ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

देशाच्या प्रगतीत व्यापाऱ्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांना सन्मान आणि संरक्षण मिळावे यासाठी माझा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. सध्या (Beed) बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निमित्ताने पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर बीड येथे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Marathwada) यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, व्यापारी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्य असो की केंद्र सरकारच्या पातळीवर व्यापाऱ्यांना ज्या काही अडचणी, प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

व्यापाऱ्या सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. भयमुक्त वातावरणात त्यांना आपला व्यापर करता आला पाहिजे. यासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही पकंजा यांनी सांगितले. तत्पुर्वी त्यांनी अंबाजोगाई बाजार समितीत भाजप पुरस्कृत उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत त्यांना विजयी करण्याचे आवाहन देखील केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com