Pankaja Munde News : पंकजा मुंडे मार्गदर्शन करत होत्या, इतक्यात 'कमळ' पडलं, काय नेमकं घडलं?

Bjp News : "पराभवाचं दुखं लोकांनी व्यक्त केले, हे अनुभवायला मिळालं .."
Pankaja Munde :
Pankaja Munde : Sarkarnama

Beed News : भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये भाजप पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी एक वेगळाच प्रसंग घडला. पंकजा मुंडे भाषण करत असताना अचानकपणे 'कमळ' पडलं. या प्रसंगाची आता सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

Pankaja Munde :
Bageshwar Baba News : राष्ट्रवादीच्या नेत्याचं बागेश्वर बाबाला सोलापूरला येण्याचं निमंत्रण : नेटकरी पडले तु़टून!

बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात पंकजा मुंडे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना हा प्रसंग घडून आला. पंकजा मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते, इतक्यात पाठीमागील बॅनरवरील कमळाचं चिन्ह खाली पडलं. यामुळे एकच चर्चा सुरू झाली. आता पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल आहेत.

पराभवाचं दुखं लोकांनी व्यक्त केले, हे अनुभवायला मिळालं :

पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड येथे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पराभव झाल्याचा जास्त फायदाच झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "पराभवामुळे वेळ मिळाला, त्या वेळेतून मला जे काही शिकायला मिळाले, मला जे अनुभवायला मिळाले ते अभूतपूर्व आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या पराभवाचं दुःखं माझ्या मतदारसंघातील लोकांसह राज्यातील लोकांना झाले, हे अनुभवायला मिळाले, हे माझे मोठे भाग्य आहे."

Pankaja Munde :
Kokan Politics : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर आगपाखड; म्हणाले...

मुंडे पुढे म्हणाल्या, "मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात काम करताना देशातील अत्यंत प्रगत मध्यप्रदेशात काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. चार वेळा मुख्यमंत्री राहूनही शिवराज चौहानसारखे साधे, सरळ, मेहनती मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला पराभवामुळे मिळाली. सचिव म्हणून बैठक घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अनुभवायला मिळत आहे"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com