Pankaja Munde News : भाजपच्या जवळ आलेल्या क्षीरसागरांना मुंडेंचा नमस्कार `स्वागता`चा कि `रामराम`चा..

Marathwada : राज्यातील भाजप मंत्र्यांसह जयदत्त क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही भेटत.
Pankaja Munde-Kshirsagar News, Beed
Pankaja Munde-Kshirsagar News, BeedSarkarnama

Beed : लोकसभा निवडणुकीत भाजपचा थेट प्रचार करुनही मुंडेंनी क्षीरसागरांना शिवसेनेचा रस्ता दाखविला. आता मात्र, क्षीरसागरांनी `अहिस्ते कदम` टाकत शिक्षक मतदार संघ निवडणुकच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार प्रा. किरण पाटील (Kiran Patil) यांच्या पारड्यात वजन टाकून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भाजपच्या जवळ येत असलेल्या क्षीरसागरांची व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंची सोमवारी योगायोगाने भेट झाली.

Pankaja Munde-Kshirsagar News, Beed
Aimim : वंचित-शिवसेनेची युती होताच, इम्तियाज यांच्याकडून राष्ट्रवादी-काॅंग्रेसला टाळी ?

पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांना नमस्कार घालत संवादही साधला. मात्र, हा नमस्कार भाजपमध्ये स्वागताचा की रामरारामाचा, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Beed) सुरुवातीपासूनच मुंडे व क्षीरसागर वेगवेगळ्या पक्षांत असले तरी त्यांच्यात एकमेका सहाय्य करु अशीच भूमिका राहीली. पुढच्या पिढीत देखील जयदत्त क्षीरसागर व पंकजा मुंडे यांच्यात हा सामंजस्य करार कायम दिसला.

मागच्या वेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीतून जयदत्त क्षीरसागर एकमेव आमदार होते. तर, पंकजा मुंडेंकडे पालकमंत्रीपद होते. मात्र, क्षीरसागरांना विकास निधीत कायम सढळ मदत राहीली. अगदी क्षीरसागरांच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयालाही बीड भाजपजनांनी हातभार लावलाच. राज्यातील भाजप मंत्र्यांसह जयदत्त क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही भेटत.

अगदी बीडच्या भूयारी गटार व नगरोत्थानच्या भूमिपुजनाला राष्ट्रवादीत असतानाही क्षीरसागरांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रीत केले. तर, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचा जल्लोष करुन आपली दिशा त्यावेळी स्पष्ट केली होती. मात्र, हा चांगुलपणा आणि सामंजस्य करार `आपापल्या घरी सुखी राहू` या सुत्रानुसार होता.

म्हणूनच लोकसभा निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना एका म्यानात दोन तलवारी नको, म्हणून शिवबंधन हाती बांधावे लागले. शेवटच्या टप्प्यात क्षीरसागरांना मंत्रीपदही मिळाले. २०१९ च्या निवडणुकीत बीडमधून जयदत्त क्षीरसागर तर परळीतून पंकजा मुंडे रिंगणात होत्या. पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला. मात्र, क्षीरसागर विजयी झाले तर जिल्ह्यात दोन मंत्री होतील ही भाजपजनांची धास्ती क्षीरसागरांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

Pankaja Munde-Kshirsagar News, Beed
Abdul Sattar News : कृषीमंत्री सत्तार दोन तास रमले सत्संगात...

आता राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहे. अगोदर ठाकरे सेनेपासून दुरावलेल्या क्षीरसागरांनी नगरोत्थानच्या रस्ते व नाल्यांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाताने उरकरले. त्यामुळे काही काळ क्षीरसारांची वाट कोणत्या दिशेने असा प्रश्न पडला. पण, ठाकरेंच्या सेनेने त्यांच्या हाताचे शिवबंधन काढून घेतले. त्यामुळे आता क्षीरसागर भाजप कि सेनेत, असे प्रश्न पडले. क्षीरसागरांची संभाव्य एंट्री जिल्हा भाजपला नको आहे. त्यासाठी ताकदही पणाला लावली जात आहे.

मात्र, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या पारड्यात आपले वजन टाकून आपली कुच भाजपच्या दिशेनेच असल्याचे क्षीरसागरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, क्षीरसागरांकडून पाठींबा घेण्यासाठी भाजपचे निवडणुक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील जिल्ह्यात आले. मात्र स्थानिक भाजपजणांनी पाठ फिरविली. यावरुनच क्षीरसागरांची भाजपच्या दिशेने असलेली वाटचाल स्थानिक भाजपजनांना नको असल्याचे स्पष्ट आहे.

Pankaja Munde-Kshirsagar News, Beed
Shivsena News : बदलीसाठी पैसे घेतले, खैरेंच्या मुलाची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल..

दरम्यान, सोमवारी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर येथील चंपावती शाळा मतदान केंद्रात भाजपच्या मंडपामध्येच माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाम मुंडे एकत्र आले. मुंडे यांनी भारतभूषण क्षीरसागर यांना नमस्कार करुन संवाद साधला. आता हा नमस्कार स्वागताचा ठरतो? का मग रामरामाचा हे येणारा काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com