Beed : फडणवीस जिल्ह्याबाबत पत्ता टाकतांना लोकसभेसह इतर निवडणुकांचाही विचार करणार?

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मासबेस लीडर आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचा भाजपला फायदा होईल हे गणित मांडले जाते. (Beed News)
Devendra Fadanvis-Pankaja Munde
Devendra Fadanvis-Pankaja MundeSarkarnama

बीड : राज्यात आता पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन व्हायचे निश्चित झाल्याने संभाव्य मंत्रिमंडळातील नावांवर खलबते होत आहेत. जिल्ह्यात (Bjp) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आणि मिळेलच असा विश्वास देखील त्यांना वाटत आहे.

मात्र, भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Marathwada) यांचा विचार हा राजकीय जाणकारांच्या विचार करण्याच्या मर्यादा संपतात तिथून सुरू होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच आतापर्यंत कधी गोपीचंद पडळकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय अशी नावे ऐनवेळी आणि अगदी अनपेक्षितपणे आली. त्याच धर्तीवर बीड (Beed) जिल्ह्याची भाजपची आगामी मांडणी करताना भाजप व फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा विचार कारण्यापेक्षा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करतील अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप आघाडीवर असताना जिल्ह्यात सहा पैकी फक्त दोन आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे राज्य भाजप व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना हाती येत असलेल्या सत्तेतील वाटा बीड जिल्ह्याला देतांना फक्त आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करणार नाहीत तर आगामी लोकसभा व विधानसभेचे गणित देखील या निमित्ताने जुळवतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व असल्यापासून भाजपने प्रचलित राजकीय समीकरणांना फाटा देत राजकीय जाणकारांचे अंदाज कायम चुकविले आहेत. यात ताजे उदाहरणे म्हटलं तर राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू किंवा महाराष्ट्रात विधान परिषदेला श्रीकांत भारतीय, उमा खापरे अशी अनपेक्षित नावे समोर आली. असाच फॉर्म्यूला बीड जिल्ह्यात का येणार नाही, असे भाजपच्या अलीकडच्या वाटचालीचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांचे मत आहे.

Devendra Fadanvis-Pankaja Munde
Mumbai : फडणवीस मंत्रीमंडळात कोण कोण ? शिंदे गटाला मिळणार झुकते माप ..

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मासबेस लीडर आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचा भाजपला फायदा होईल हे गणित मांडले जाते. परंतु, आताची भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मासबेस पेक्षा त्यांच्या चैकटीत आणि शब्दात बांधलेले असावे लागते हा मुद्दा पंकजा मुंडे यांची खरी अडचण आहे. त्या पक्क्या भाजपनिष्ठ असल्या तरी सध्या फडणवीस यांच्या भोवतालचे इतर नेते जसे वागतात तशा त्या इतके झुकून वागू शकत नाहीत. त्यांच्यात स्पष्टवक्तेपणा, परखडपणा आहे.

पंकजा मुंडे यांना नको वाटत असताना विनायक मेटे यांच्यासाठी मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात त्यावेळी पाच पैकी एकही आमदार नव्हता. त्यामुळे फडणवीस त्यांच्या नावासह भाजपच्या जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांचाही विचार करू शकते असेही गणित मांडले जात आहे.

विद्यमान आमदारांपैकी कोणाला पद देण्यापेक्षा आगामी निवडणुकांचा विचार करून राज्यपाल नियुक्त १२ जागेत आणखी एखाद्याला संधी देऊन आताच्या विधानसभेच्या दोन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक अशा तीन आमदारांत चौथा देऊन आगामी लोकसभा व विधानसभेचे गणित आणखी पक्के होईल अशीही बांधणी होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com