Paithan Market Committee News
Paithan Market Committee NewsSarkarnama

Paithan APMC Election : पैठण बाजार समितीवर मंत्री भुमरेंची सत्ता कायम राहाणार का ?

Marathwada : भुमरे यांचे शिवशाही पॅनेल तर महाविकास आघाडीच्या परिवर्तन विकास पॅनेलमध्ये थेट लढत झाली.

Chhatrapati Sambhajinagar : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पैठण तालुक्यात ९५ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले असून किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदारांनी आपला कौल दिला आहे, उद्या (ता. १) सकाळी मतमोजणीला सुरूवात होईल.

Paithan Market Committee News
Ambad APMC Election : आमदार कुचे समर्थक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची..

गेल्या कित्येक वर्षापासून (Paithan) पैठण बाजार समितीवर संदीपान भुमरे यांची एकहाती सत्ता राहिले आहे. ती राज्यातील सत्तांतर आणि घडलेल्या घडामोडीनंतर कायम राहणार का ? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. (Mahavikas Aghadi) बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज मतदान झाले. पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली.

संदीपान भुमरे यांचे शिवशाही पॅनेल तर दुसरे राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे परिवर्तन विकास पॅनेलमध्ये थेट लढत झाली. (Shivsena) त्यामुळे महाविकास आघाडी व शिंदे गट शिवसेना यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. निवडणुकीत भाजप पक्ष सुरुवातीला दुर राहिला असला तरी नंतर भाजनेही शिंदे गटासोबत सामील होण्याचा निर्णय घेतला.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महाविकास आघाडीतील माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार चंद्रकांत घोडके, संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे, विनोद तांबे, अप्पासाहेब निर्मळ या स्थानिक नेत्यांनी प्रचारात राळ उठवली. आरोप प्रत्यारोपांनी बाजार समितीचा निवडणूक प्रचार चांगलाच गाजला. आज एकूण मतदान ३ हजार ८३८ मतदारांपैकी ३ हजार ७४२ जणांनी प्रत्यक्षात मतदान केले. मतमोजणी पैठण येथील पंचायत समितीच्या कार्यालयात उद्या सोमवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com