दहशतवाद्यांची वकिली करणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमसोबत कधीच जाणार नाही..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना शिवसेनेने संभाजीगरच्या संदर्भात वेळोवेळी किमान दहा भेटी घेतल्या. औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक झाली तेव्हा देखीलआठवण करून दिली. (Shivsena)
Mla Ambadas Danve-Owasi
Mla Ambadas Danve-OwasiSarkarnama

मुंबई : भाजपने एमआयएमला कदाचित साईड ट्रॅक केले असावे, म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला असावा. (Shivsena) पण महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या सर्वांनीच या प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Aimim) जे ओवोसी दहशतवाद्यांची वकिली करतात, त्यांच्याबरोबर शिवसेना कदापी जाणार नाही, याचा पुनरुच्चार शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी केला. (Marathwada)

विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा त्यांनी एमआयएमच्या प्रस्तावावर भाष्य केले. दानवे म्हणाले, मागच्या चार-पाच दिवसांपासून एमआयएमने महाविकास आघाडी सोबत चौथे चाक म्हणून सोबत येण्याची तयारी दर्शवली होती, पण जे औरंगजेबापुढे गुडघे टेकतात, ज्या मराठवाड्यात रझाकारांच्या खुना अजूनही कायम आहेत, लोक त्या विसरलेले नाहीत, हे वंदे मातरमला विरोध करतात, ज्यांचे स्वप्न भगवा उखडून हिरवा फडकवण्याचे आहे, त्यांच्यासोबत महाविकास आघाडी कदापी जाणार नाही, हे सगळ्याच नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपने कदाचित एमआयएमला पाठबळ देण्याचे कमी केले, म्हणून हा डाव टाकला असावा. भाजपची बी टीम म्हणून ओळखली जाते, ते उत्तर प्रदेश, बिहारच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. दुसरा विषय संभाजीनगरचा, ज्यावर विधानसभेत भाजपकडून वारंवार उपस्थितीत केला जातो. ९ मे १९८६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केलेले आहे. जनतेच्या मनामनात ते कोरले गेले आहे.

पण राज्यात युतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना शिवसेनेने संभाजीगरच्या संदर्भात वेळोवेळी किमान दहा भेटी घेतल्या. औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक झाली तेव्हा देखील संभाजीनगरच्या नामकरणाची आठवण आम्ही त्यांना करून दिली. पण पाच वर्षात भाजपने हा मुद्दा कुठेच आणला नाही, परंतु आता ते यावरून राजकारण करत आहे.

Mla Ambadas Danve-Owasi
लातूर-बीड मैत्रीची परंपरा कायम; धनंजय मुंडेनी दिल्या अमित देशमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसा प्रस्ताव केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे सव्वा वर्षापुर्वीच पाठवला पण त्यावरही निर्णय घेतला जात नाही. थोडक्यात संभाजी राजांचे नाव घेऊन भाजपला फक्त राजकारण करायचे आहे, हे स्पष्ट होते, असा आरोप देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com