Grampanchayt Election : मुंडे बहिण-भावांसह जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांचा लागणार कस..

Marathwada : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून या निवडणुकांकडे बघितले जाते.
Grampanchayat Election News, Beed
Grampanchayat Election News, BeedSarkarnama

Beed News : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ठिकाणचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ६५६ सरपंच आणि ५२९५ सदस्यांसाठी नेत्यांचा कस लागणार आहे. ग्रामंपचायत निवडणुका स्थानिक पातळीवर पॅनल उभे करून लढल्या जात असल्या तरी जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा त्यात हस्तक्षेप असतोच. Dhnanjay Munde धनंजय मुंडे यांनी काही ग्रामपंचायती आणि सरपंच बिनविरोध करत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी उर्वरित ठिकाणचे सरपंच आणि सदस्य निवडून आणतांना त्यांना आपल्या बहिणी आणि भाजपमधील विरोधी आमदार, लोकप्रतिनिधींशी दोन हात करावे लागणार आहेत.

Grampanchayat Election News, Beed
Ashok Chavan : नांदेडहून मुंबई , दिल्ली, नागपूर, कोल्हापूरसाठी विमान सुरू करा..

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित, मनसे आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा कस लागणार आहे. (Beed) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या (Grampanchayt Election) ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्यात होत असलेल्या ७०४ ग्रामपंचायतींपैकी ४७ सरपंचपदांच्या निवडी बिनविरोध झाल्या तर एका ठिकाणी एकही उमेवारी अर्ज दाखल झालेला नाही.

त्यामुळे आता थेट जनतेतून निवड होणाऱ्या ६५६ सरपंचपदांसाठी व तब्बल ५२९५ ग्रामपंचायत सदस्यांसाठी जोरदार लढती होत आहेत. दरम्यान, एका गावच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज नसून सदस्यपदांच्या पाच जागांसाठीही एकही उमेदवार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीबाबत नंतर निर्णय होणार आहे. जिल्ह्यात ४० गावांतील सरपंचपदांसह सर्व सदस्यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या आहेत.

सर्वाधिक १३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बीड तालुक्यात होऊ घातल्या होत्या. तर, सर्वाधिक १३ ग्रामपंचातींच्या बिनविरोध निवडीही याच मतदार संघात होत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडीत, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, भाजपचे रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आदी प्रमुख नेत्यांनी आपल्या समर्थकांचे पॅनल मैदानात उतरवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com