
उस्मानाबाद : भाजपचे उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्वीजय शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत आज राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (Ncp) प्रेवश केला. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, उपमुख्यंमत्री अजित पवार, राज्यमंत्री संजय बनसोड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अजित पवार यांनी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात पक्षाची ताकद नव्याने वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उमरगा तालुक्यात भाजपचे (Bjp) महत्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याने भाजपला हा मोठा दणका समजला जातो. दिग्विजय शिंदे यांनी पक्षाला राम राम करण्याचा इरादा नुकताच स्पष्ट केला होता. पक्षात आलेल्या नवीन नेतृत्वाला कंटाळुन ते पक्षत्याग करत असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे.
उमरगा भागामध्ये कैलास शिंदे व दिग्वीजय शिंदे या पितापुत्राचे राजकीय वजन आहे. कैलास शिंदे हे जिल्हा परिषद व जिल्हा बँकेत सातत्याने निवडुन आले असुन पहिल्यांदा दिग्वीजय शिंदे हे देखील जिल्हा परिषदेमध्ये निवडुन गेले. शिवाय पक्षाने त्यांना समाजकल्याण सभापतीचे पद देऊन योग्य सन्मानही राखला होता. मात्र नंतरच्या काळामध्ये पक्षीय नेतृत्वामध्ये व शिंदे यांच्यात कुरबुरी वाढत गेल्या, टोकाचे मतभेद होत असल्याचे पाहुन शेवटी शिंदे यांनी पक्षाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला.
दिग्वीजय यांनी राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी करत पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानूसार आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात शिंदे व त्यांच्या समर्थकांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामार्फत हा प्रवेश झाला असून पक्षाला तालुक्यात चांगला चेहरा मिळाला आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनाही शिंदे यांची मदत होणार असल्याने त्यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
एक तरुण व दलित चेहरा म्हणुन पक्षाला राजकीयदृष्ट्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षप्रवेशाचा चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय भाजपमधील अनेक अस्वस्थांना ते गळाला लावु शकतात, अशी देखील चर्चा आहे. उमरगा तालुक्यात सध्यस्थितीला भाजपची शक्ती मर्यादीतच असुन चालुक्य परिवारावर तिथली भिस्त आहे.
त्यात शिंदे यांनी भाजप सोडल्याने निश्चितपणे काही प्रमाणात पक्षाला धक्का बसणार आहे. कैलास शिंदे यांनी आपण भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते किती सक्रीय राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चिरंजीव पक्ष सोडुन गेल्यानंतर भाजपचे जिल्ह्यातील नेतृत्व यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणार का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.