Osmanabad : सलगर कुंटुंबाकडून सुप्रिया सुळे यांचे औक्षण अन् घोंगडी भेट देऊन स्वागत..

सुळे यानी खास सक्षणा सलगर यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुक प्रचार सभेसाठी हजेरी लावली होती. आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनी कार्यकर्त्याप्रती असलेली भावना व्यक्त केली आहे. (Supriya Sule)
Ncp Leader Mp Supriya Sule
Ncp Leader Mp Supriya SuleSarkarnama

उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या घरी भेट दिली. (Osmanabad) आजवर अजित पवार यांचे सासर असलेल्या घरीच राष्ट्रवादीच्या नेत्याचा राबता असायचा पण राजकीय समीकरण बदलल्याने त्याचेही परिणाम आता हळुहळु दिसु लागले आहेत. या आधीही सुप्रिया सुळे यानी खास सक्षणा सलगर (Ncp) यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुक प्रचार सभेसाठी हजेरी लावली होती. आता थेट तेर येथील त्यांच्या घरी जाऊन सुळे यानी कार्यकर्त्याप्रती त्यांच्या मनात असलेली भावना व्यक्त केली आहे.

सक्षणा सलगर यांच्या आग्रहाखातर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दौऱ्यातुन वेळ काढत त्यांच्या घरी भेट दिली. जिल्ह्यातील दौऱ्याची सुरुवात देखील सुळे यांनी तेर येथूनच केली. या भेटीदरम्यान सक्षणा सलगर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा त्यांचे अत्यंत आपुलकीने औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यापुर्वी सहा मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देखील जिल्ह्यामध्ये खास सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास कामाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती.

आकुबाई पाडोळी मतदारसंघात एक मोठा पक्षीय मेळावा देखील यावेळी आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन सक्षणा सलगर यांच्याकडुन करण्यात आले होते. खास एका सामान्य कार्यकर्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा येतात ही बाब निश्चितच कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरली होती.

Ncp Leader Mp Supriya Sule
Marathwada : नांदेडात चाललंय तरी काय ? खंडणीसाठी माजी मंत्र्याच्या घरात बंदुकधारी घुसला..

पवार देशाचे नेते असून देखील एका सामान्य कार्यकर्त्यासाठी ते मेळाव्याला केवळ उपस्थित राहिले नव्हे तर तब्बल साडेपाच तासाचा वेळ त्यानी या सर्व कार्यक्रमासाठी दिला होता. त्याच प्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांनीही सक्षणा सलगर यांच्या घरी भेट देऊन सामान्य कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी दाखवल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com